Brahmastra: ‘ब्रह्मास्त्र’ने जगभरात अवघ्या दोन दिवसांत कमावले तब्बल इतके कोटी रुपये
ब्रह्मास्त्रच्या हिंदी व्हर्जनची कमाई खूप चांगली सुरू आहे. त्याचसोबत डबिंग केलेले व्हर्जनसुद्धा बॉक्स ऑफिसवर आपली कमाल दाखवत आहेत. या चित्रपटाने शनिवारी तमिळनाडूमध्ये (Tamilnadu) विक्रम रचला.
अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) या चित्रपटाची सुरुवात अत्यंत दमदार झाली. दुसऱ्या दिवशीही या चित्रपटाने दणक्यात कमाई (Box Office Collection) केली आहे. शनिवारी या चित्रपटाने जगभरात तब्बल 85 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे पहिल्या दोन दिवसांची कमाई ही आता 160 कोटींवर पोहोचली आहे. पहिल्या वीकेंडला हा चित्रपट कमाईचा 250 कोटींचा आकडा पार करेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ब्रह्मास्त्रच्या हिंदी व्हर्जनची कमाई खूप चांगली सुरू आहे. त्याचसोबत डबिंग केलेले व्हर्जनसुद्धा बॉक्स ऑफिसवर आपली कमाल दाखवत आहेत. या चित्रपटाने शनिवारी तमिळनाडूमध्ये (Tamilnadu) विक्रम रचला.
‘ब्रह्मास्त्र’ची जगभरातील कमाई
शुक्रवार- 75 कोटी रुपये शनिवार- 85 कोटी रुपये एकूण- 160 कोटी रुपये
हा चित्रपट तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेच डब केला गेला. या चारही व्हर्जनमधील कमाई समाधनकारक आहे. चित्रपटातील नागार्जुनची भूमिका आणि बाहुबली फेम एस. एस. राजामौली यांनी प्रमोशन केल्याने तेलुगू व्हर्जनची कमाई चांगली होण्याची अपेक्षा होतीच. मात्र तमिळ व्हर्जनच्या कमाईने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. ब्रह्मास्त्रने शनिवारी तमिळनाडूमध्ये 1.9 कोटी रुपयांची कमाई केली. एखाद्या बॉलिवूड चित्रपटाने एका दिवसात एवढी कमाई करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
BRAHMĀSTRA 2-DAYS BOX OFFICE ???
प्यार से बड़ा कोई ब्रह्मास्त्र नहीं है इस दुनिया में ।
Thank you to all our audiences, for spreading Love and Light in Cinemas this weekend ! ❤️?
Book tickets now!
BMS – https://t.co/qjPVPFw8u1 Paytm – https://t.co/eVmK21MLmv#Brahmastra pic.twitter.com/dhuNsYImZX
— BRAHMĀSTRA (@BrahmastraFilm) September 11, 2022
तमिळनाडूमध्ये ब्रह्मास्त्रने ‘वॉर’ आणि ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटांना मागे टाकलं आहे. ब्रह्मास्त्र- पार्ट वन शिवा या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट यांच्यासोबतच अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. त्याचसोबत शाहरुख खान यामध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षक-समिक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. तब्बल 410 कोटींच्या बजेटमध्ये हा चित्रपट बनवण्यात आला आहे.