Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Brahmastra: पहिल्याच दिवशी ‘ब्रह्मास्त्र’ करणार धमाका; ‘सूर्यवंशी’ला टाकणार मागे?

ॲडव्हान्स बुकिंगचा आकडा पाहता रणबीर-आलियाचा हा चित्रपट बंपर ओपनिंग करेल अशी शक्यता आहे. प्रदर्शनाच्या दिवशी दणक्यात कमाई झाल्यास हा चित्रपट भुल भुलैय्या 2 आणि सूर्यवंशीलाही मागे टाकू शकेल.

Brahmastra: पहिल्याच दिवशी 'ब्रह्मास्त्र' करणार धमाका; 'सूर्यवंशी'ला टाकणार मागे?
Ranbir in BrahmastraImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Sep 08, 2022 | 2:38 PM

सोशल मीडियावर ‘बॉयकॉट’चा ट्रेंड सुरू असतानाही प्रदर्शनापूर्वीच ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) प्रेक्षकांना आकर्षित करतोय. उद्या म्हणजेच 9 सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. बुधवारी रात्रीपर्यंत ‘ब्रह्मास्त्र’ने ॲडव्हान्स बुकिंगमधून (advance booking) 23 कोटी रुपयांची कमाई केली. अर्ध्यापैकी जास्त कमाई (Box Office Collection) ही प्रदर्शनाच्या दिवशीच होणार असल्याचं दिसतंय. कोरोना महामारी आणि लॉकडाऊननंतर बॉक्स ऑफिसवर चांगली ओपनिंग करणारा हा चित्रपट ठरू शकतो. ॲडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या ‘ब्रह्मास्त्र’ने नवा विक्रम रचला आहे.

देशभरातील ‘ब्रह्मास्त्र’च्या पाच भाषांमधील ॲडव्हान्स बुकिंगचा आकडा पाहता त्यातून पहिल्या दिवसाची 11 कोटींचा कमाई झाली. फक्त हिंदी भाषेतील ॲडव्हान्स बुकिंगच्या कमाईचा आकडा हा 10 कोटींवर आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटाने RRR लाही मागे टाकलंय. RRR या चित्रपटाची पहिल्या दिवसाची ॲडव्हान्स बुकिंग ही 7 कोटींची झाली होती. असं असलं तरी ‘ब्रह्मास्त्र’ हा ‘केजीएफ: चाप्टर 2’ला मागे टाकू शकला नाही. केजीएफ 2 च्या हिंदी व्हर्जनची ॲडव्हान्स बुकिंग ही तब्बल 40 कोटींची झाली होती.

हे सुद्धा वाचा

ब्रह्मास्त्रच्या तेलुगू व्हर्जनच्या ॲडव्हान्स बुकिंगमधून आतापर्यंत 98 लाख रुपये, तर तमिळ व्हर्जनमधून 11.1 लाख रुपयांची कमाई झाली आहे. कन्नड आणि मल्याळम भाषेतील ॲडव्हान्स बुकिंग फारशी होऊ शकली नाही.

ॲडव्हान्स बुकिंगचा आकडा पाहता रणबीर-आलियाचा हा चित्रपट बंपर ओपनिंग करेल अशी शक्यता आहे. प्रदर्शनाच्या दिवशी दणक्यात कमाई झाल्यास हा चित्रपट भुल भुलैय्या 2 आणि सूर्यवंशीलाही मागे टाकू शकेल. कार्तिक आर्यनच्या भुल भुलैय्या 2 या चित्रपटाने पहिल्या दिवशी 14.5 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर अक्षय कुमारच्या सूर्यवंशीने 26 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.

तब्बल 410 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला ‘ब्रह्मास्त्र’ हा 2D, 3D आणि IMAX 3D मध्ये जगभरात प्रदर्शित होणार आहे. यामध्ये रणबीर-आलियासोबतच अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक.
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?.
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?.
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत.
खोक्याला वनविभागाच्या कोठडीत जबर मारहाण, अंगावर वळ अन्... फोटो व्हायरल
खोक्याला वनविभागाच्या कोठडीत जबर मारहाण, अंगावर वळ अन्... फोटो व्हायरल.
मुंबईकरांनो काळजी घ्या, कारण उद्यापासून... हवामान खात्यानं काय म्हटलं?
मुंबईकरांनो काळजी घ्या, कारण उद्यापासून... हवामान खात्यानं काय म्हटलं?.
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं निधन, देशभरात शोककळा
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं निधन, देशभरात शोककळा.
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात..
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात...
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'.