Brahmastra | ‘ब्रह्मास्त्र’च्या बॉक्स ऑफिसवरील कलेक्शनवर सेलिब्रिटींनी घेतला मोठा आक्षेप…
ब्रह्मास्त्र चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चा होती. हा चित्रपट आता चाहत्यांच्या भेटीला आलायं. चित्रपटाने तीन दिवसांमध्ये चांगली कमाई देखील केलीयं. मात्र, आता ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या बाॅक्स आॅफिसवरील कलेक्शन बाबत शंका उपस्थित केली जातंय.
मुंबई : आलिया भट्ट आणि रणबीरचा ब्रह्मास्त्र (Brahmastra) चित्रपट बाॅक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोयं. चित्रपटाने 3 दिवसांमध्ये तब्बल 120 कोटींची मोठी कमाई केलीयं. 9 सप्टेंबरला ओपनिंग डेलाच चित्रपटाने तब्बल 34 कोटी कमावल्याने अनेकांनी आर्श्चय व्यक्त केले. चित्रपट 9 सप्टेंबर म्हणजेच शुक्रवारी रिलीज (Release) झालायं, आॅफ डेला चित्रपट बॉक्स ऑफिसवर इतकी कमाई करूच शकत नसल्याचा दावा अनेकांनी केलायं. अयान मुखर्जी आणि ब्रह्मास्त्र चित्रपटाची टीम बॉक्स ऑफिसवरील कलेक्शनमध्ये फेरफार करत असल्याचा आरोप (Accusation) आता केला जातोयं.
बॉक्स ऑफिसवरील कलेक्शन बाबत उपस्थित केला मोठा प्रश्न
ब्रह्मास्त्र चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चा होती. हा चित्रपट आता चाहत्यांच्या भेटीला आलायं. चित्रपटाने तीन दिवसांमध्ये चांगली कमाई देखील केलीयं. मात्र, आता ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील कलेक्शन बाबत शंका उपस्थित केली जातेय. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, मौनी रॉय आणि नागार्जुन महत्वाच्या भूमिकेत आहेत. विशेष म्हणजे चित्रपटात शाहरुख खानही दिसलायं.
आकडेवारीत फेरफार होत असल्याचा आरोप सेलिब्रिटींकडून
कंगना रानाैत आणि बाॅलिवूडमधील काही सेलिब्रिटींनी अयान मुखर्जी आणि चित्रपटाच्या टिमवर गंभीर आरोप केले. त्यांनी असा दावा केला आहे की, बॉक्स ऑफिसवरील कलेक्शनच्या आकडेवारीत मोठा फेरफार केला जातोयं. पहिल्याच दिवशी शुक्रवारी ब्रह्मास्त्र चित्रपट 34 कोटींची कमाई कसा करू शकतो. आता यावर अयान मुखर्जी किंवा आलिया भट्ट आणि रणबीर कपूरकडून नेमके काय उत्तर दिले जाते हे बघण्यासारखे ठरणार आहे.