Brahmastra Trailer: रणबीर-आलियाच्या ‘ब्रह्मास्त्र’च्या ट्रेलरचा धुमाकूळ; ट्विटरवर प्रतिक्रियांचा पाऊस

जवळपास आठ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर हा चित्रपट आता 9 सप्टेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. ट्रेलर पाहून तुम्ही अंदाज लावू शकता की यामागे दिग्दर्शक अयान मुखर्जीने किती मेहनत घेतली आहे.

Brahmastra Trailer: रणबीर-आलियाच्या 'ब्रह्मास्त्र'च्या ट्रेलरचा धुमाकूळ; ट्विटरवर प्रतिक्रियांचा पाऊस
Brahmastra TrailerImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Jun 15, 2022 | 3:10 PM

अयान मुखर्जी (Ayan Mukherji) दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) या चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. पौराणिक कथेला आधुनिकतेची जोड देत हा चित्रपट साकारण्यात आला आहे. त्याची झलक या ट्रेलरमध्ये पहायला मिळते. जवळपास आठ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर हा चित्रपट आता 9 सप्टेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. ट्रेलर पाहून तुम्ही अंदाज लावू शकता की यामागे दिग्दर्शक अयान मुखर्जीने किती मेहनत घेतली आहे. रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) वाईट शक्तींशी लढताना दिसत आहेत. ब्रह्मास्त्र हा तीन भागांमध्ये प्रदर्शित होणार असून पार्ट वन- शिवाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरने अवघ्या काही तासांतच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. सर्वसामान्यांसह सेलिब्रिटीसुद्धा त्यावर विविध प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. या चित्रपटात रणबीर, आलियासोबतच अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय यांच्याही भूमिका आहेत.

ट्रेलर पाहून हे स्पष्ट होतं की हा चित्रपट शिवा (रणबीर कपूर) नावाच्या माणसावर आधारित आहे, ज्याच्याकडे अलौकिक शक्ती आहे आणि त्याला स्वतःला याबद्दल फार माहिती नाही. शिवा आणि ईशा (आलिया भट्ट) एकमेकांवर प्रेम करू लागतात, तेव्हा त्याला त्याच्या शक्तींबद्दल कळतं. अमिताभ बच्चन आणि नागार्जुन या विश्वाचं रक्षण करताना दिसत आहेत, तर मौनी रॉय नकारात्मक भूमिकेत दिसत आहे.

हे सुद्धा वाचा

पहा ट्रेलर-

ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्यावर नेटकऱ्यांच्या सकारात्मक प्रतिक्रिया येऊ लागल्या. ‘अप्रतिम ट्रेलर आहे, याआधी इतका ग्रँड बॉलिवूड चित्रपटाचा ट्रेलर कधीच पाहिला नव्हता’, असं एकाने लिहिलं. तर ‘नाही, तुम्ही हे स्वप्न पाहत नाही आहात. हा खरंच भारतीय सिनेमा आहे’, असं दुसऱ्याने म्हटलं. ‘या ट्रेलरमधील सर्वोत्कृष्ट बाब म्हणजे त्यातील VFX’ अशा शब्दांत नेटकऱ्यांनी कौतुक केलं. या ट्रेलरने चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. यातील मौनी रॉयच्या भूमिकेचंही विशेष कौतुक होत आहे. मौनीने टेलिव्हिजनवरून आपल्या करिअरची सुरुवात केली आणि आता तिने बॉलिवूडमध्ये दमदार भूमिका आपल्या नावे केली आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया-

‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाच्या निमित्ताने रणबीर आणि आलिया पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. लग्नानंतर या दोघांचा हा पहिलाच चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अनेक कारणांमुळे या चित्रपटाचं प्रदर्शन लांबणीवर टाकलं जात होतं. मात्र अखेर सप्टेंबरमध्ये हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.