Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

The Kashmir Files: एवढाच पुळका आहे तर कमाईचे दीडशे कोटी काश्मिरी पंडितांना देणार का? विवेक अग्निहोत्रींना नवं आव्हान

विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित 'द काश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) हा चित्रपट एकीकडे बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवे विक्रम रचतोय, तर दुसरीकडे याच चित्रपटावरून सोशल मीडियावर वादंग उठलंय. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या चित्रपटाचं कौतुक केलं आणि देशभर त्याच गोष्टीवरून सामाजिक आणि राजकीय मतभेदाचा वणवा पेटला.

The Kashmir Files: एवढाच पुळका आहे तर कमाईचे दीडशे कोटी काश्मिरी पंडितांना देणार का? विवेक अग्निहोत्रींना नवं आव्हान
Vivek Agnihotri Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 20, 2022 | 7:26 PM

विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट एकीकडे बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवे विक्रम रचतोय, तर दुसरीकडे याच चित्रपटावरून सोशल मीडियावर वादंग उठलंय. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या चित्रपटाचं कौतुक केलं आणि देशभर त्याच गोष्टीवरून सामाजिक आणि राजकीय मतभेदाचा वणवा पेटला. देशातील काही राज्यांमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री (Tax Free) करण्यात आला तर काहीजण या चित्रपटाचं मोफक स्क्रीनिंगचं आयोजन करत आहेत. अशाच एका मोफत स्क्रिनिंगचा पोस्ट शेअर करत विवेक अग्निहोत्रींनी ट्विट केलं. ‘अशाप्रकारे द काश्मीर फाईल्स उघड आणि मोफत दाखवणं हा फौजदारी गुन्हा आहे. मी तुम्हाला असं करण्यापासून थांबण्याची विनंती करतो. राजकीय नेत्यांनी सर्जनशील व्यवसायाचा आदर केला पाहिजे आणि खरा राष्ट्रवाद आणि समाजसेवा म्हणजे कायदेशीर आणि शांततेनं तिकीट खरेदी करणं होयं’, असं त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलं. मात्र या ट्विटनंतर त्यांच्यासमोर एक नवीन आव्हान उभं राहिलं आहे.

‘एवढाच पुळका आहे तर कमाईचे दीडशे कोटी काश्मिरी पंडितांनात देणार का?’

चित्रपटाने कमावलेले पैसे हे काश्मिरी पंडितांना देणार का, असा सवाल एका पत्रकाराने अग्निहोत्रींना केला आहे. ‘राष्ट्रवाद हा बहाणा आहे, खरा हेतू हा पैसा कमावणं आहे. द काश्मीर फाईल्सच्या कमाईचा पैसा काश्मिरी पंडितांना देणार असल्याचं जाहीर करा. आम्ही स्वत: अनेकदा तो चित्रपट पहायला जाऊ. विनोद काप्री सरांनी 1232km पुस्तकाचे पैसे मजुरांना देण्याचं जाहीर केलं होतं. विवेक अग्निहोत्रीजी, तुम्हाला कोणी थांबवलंय?’, असं ट्विट त्यांनी केलं आहे. ‘चित्रपट बनवायला पैसे लागले असतील, पण असा चित्रपट बनवणं गरजेचं होतं, जो काश्मिरी पंडितांच्या वेदना दाखवतोय आणि अनेक लोकांचा खरा चेहरा समोर आणतोय. या चांगल्या कार्यासाठी कलाकार फुकटात काम करू शकत नव्हते का? आयुष्यात पैसाच सर्वस्व आहे का’, असाही प्रश्न त्यांनी या ट्विटमध्ये मांडला आहे.

इस्लामचा स्वीकार करा, काश्मीर सोडा किंवा मृत्यूला सामोरं जा.. हा नारा देत दहशतवाद्यांनी 1990 मध्ये काश्मीरमधील हिंदूवर हल्ला चढवला होता. काश्मिरी पंडितांना बेघर करून त्यांची निर्दयपणे हत्या करण्यात आली. मात्र हे सत्य तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी दडपण्याचा प्रयत्न केला, असा दावा या चित्रपटात करण्यात आला आहे. द काश्मीर फाईल्सला भाजप नेत्यांकडून मिळालेलं समर्थन खूप परिणामकारक ठरलंय. गोवा, मध्य प्रदेश, आसाम, कर्नाटक याठिकाणी हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. महाराष्ट्रातही हा चित्रपट टॅक्स फ्री करण्याची मागणी करण्यात आली, परंतु यावर बोलताना या चित्रपटाच्या आडून राज्यातील कायदा-सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी भूमिका गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेतली. द काश्मीर फाईल्स या चित्रपटावरून सुरू झालेला वाद अजूनही थांबलेला नाही. या सगळ्यांचा एक चांगला परिणाम म्हणजे चित्रपट बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई करतोय. अवघ्या आठ दिवसांत या चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा पार केला आहे.

हेही वाचा:

‘जय संतोषी माँ’बाबत जे घडलं तेच 47 वर्षांनंतर The Kashmir Files बाबत घडतंय; पुन्हा घडणार इतिहास?

Video: मुलाखतीदरम्यान चिन्मयने केलं असं काही… जे ऐकून तुमचाही ऊर अभिमानाने भरून येईल!

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.