या अभिनेत्रीला ओळखलंत का? इंडस्ट्रीतील प्रतिष्ठित कुटुंबातील सून असूनही मुलींसाठी केला संघर्ष
बॉलिवूड (Bollywood) इंडस्ट्रीतील प्रत्येक कलाकाराची स्वतंत्र अशी संघर्षकथा आहे. काहींना इंडस्ट्रीत नाव कमावण्यासाठी संघर्ष करावा लागला, तर इंडस्ट्रीत लोकप्रिय कलाकार होऊनसुद्धा काहींना वैयक्तिक आयुष्यात अनेक समस्यांना सामोर जावं लागलं.
बॉलिवूड (Bollywood) इंडस्ट्रीतील प्रत्येक कलाकाराची स्वतंत्र अशी संघर्षकथा आहे. काहींना इंडस्ट्रीत नाव कमावण्यासाठी संघर्ष करावा लागला, तर इंडस्ट्रीत लोकप्रिय कलाकार होऊनसुद्धा काहींना वैयक्तिक आयुष्यात अनेक समस्यांना सामोर जावं लागलं. अशाच एका अभिनेत्रीचा आज वाढदिवस आहे. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरने (Kareena Kapoor) सोशल मीडियावर हा फोटो पोस्ट करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने पोस्ट केलेल्या या फोटोवर चाहत्यांकडून इंडस्ट्रीतील इतर कलाकारांकडून लाइक्स आणि शुभेच्छांचा वर्षाव होतोय. फोटोमधील ही अभिनेत्री आहे करीना आणि करिश्मा कपूर यांची आई आणि बॉलिवूडची एकेकाळची प्रसिद्ध अभिनेत्री.. बबिता कपूर (Babita Kapoor). कपूरसारख्या इंडस्ट्रीतील प्रतिष्ठित कुटुंबाची सून झाल्यानंतरही बबिता यांना वैयक्तिक आयुष्यात बराच संघर्ष करावा लागला. आजही बबिता या पती रणधीर कपूर यांच्यापासून वेगळ्या राहतात. या दोघांनी अद्याप एकमेकांना घटस्फोट दिला नाही.
बबिता यांचा 1948 मध्ये पाकिस्तानमधील कराचीमध्ये जन्म झाला. 1971 मध्ये त्यांनी राज कपूर यांचा मोठा मुलगा आणि अभिनेते रणधीर कपूर यांच्याशी लग्न केलं. या लग्नानंतर बबिता यांचं आयुष्यच बदललं. बबिता यांचा बॉलिवूडमधील करिअर फार छोटा असला तरी त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या होत्या. ‘राज’ या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर ‘हसीना मान जाएगी’, ‘जीत’, ‘डोली’ आणि ‘एक हसीना दो दिवाने’ अशा चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. करिअरच्या शिखरावर असताना बबिता या रणधीर कपूर यांच्या प्रेमात पडल्या. त्यांच्याशी लग्न केल्यानंतर बबिता यांच्या फिल्मी करिअरला पूर्णविराम लागला. कारण कपूर कुटुंबातील सुनेला लग्नानंतर इंडस्ट्रीत काम करण्याची परवानगी नव्हती.
करीना कपूरची पोस्ट-
View this post on Instagram
रणधीर कपूर यांच्यापासून वेगळं राहिल्यानंतर बबिता यांनीच करिष्मा आणि करीनाचं संगोपन केलं. “लहानाचं मोठं होताना माझी आणि करिष्माची वडिलांशी फारशी भेट होत नसे. कपूर कुटुंबीयांकडून माझ्या आईला त्यावेळी आर्थिक मदतसुद्धा मिळाली नव्हती”, असं करीनाने 2007 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं. 1988 मध्ये रणधीर कपूर हे पत्नी आणि मुलींपासून वेगळे होऊन आई-वडिलांसोबत राहू लागले होते.
हेही वाचा:
VIDEO: गहना वशिष्ठचा एकता कपूरवर गंभीर आरोप, “तिच्यामुळे मी आत्महत्येचा विचार..”