मुंबई : कपिल शर्माचा शो ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) आता परत एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. गेल्या अनेक महिन्यांपासून कपिल शर्मा शोचे चाहते शोची आतुरतेने वाट पाहात होते. गेल्या आठवड्यापासून शो सुरू झाल्याने प्रेक्षकांमध्ये (Audience) उत्साहाचे वातावरण बघायला मिळतंय. यावेळी शोमध्ये अनेक नवीन कलाकार आले असून जुने काही चेहरे यंदाच्या सीजनमध्ये दिसत नाहीयंत. इतकेच नाही तर जुने चेहरे शोमध्ये दिसत नसल्याचे अनेक चर्चांना उधाण आले. द कपिल शर्मा शोमध्ये चंदू उर्फ चंदन प्रभाकर (Chandan Prabhakar) दिसणार नसल्याच्या काही दिवसांपूर्वी बातम्या आल्या होत्या.
द कपिल शर्मा शोमध्ये काम करणाऱ्या बऱ्याच कलाकरांनी शोला राम राम ठोकल्या. यामुळे एक वेगळीच चर्चा बाहेर सुरू आहेत. या सीजनमध्ये चंदन प्रभाकर नसल्याच्या काही दिवसांपूर्वी बातम्या होत्या. मात्र, पहिल्या भागामध्ये चंदन प्रभाकर दिसल्याने प्रेक्षकांना मोठा धक्काच बसलाय. खरोखरच चंदन प्रभाकरने कपिल शर्मा शो सोडला की नाही हा प्रश्न अनेकांना पडलाय. इतकेच नाही तर एका मुलाखतीमध्ये चंदन प्रभाकरने शो सोडण्याचे मोठे कारण सांगितले आहे.
‘ई-टाइम्स’शी बोलताना चंदन प्रभाकरने सांगितले की, मी गेल्या पाच वर्षांपासून या शोचा महत्वपूर्ण भाग होतो. माझ्यामध्ये आणि कपिल शर्मामध्ये कोणताच वाद झालेला नाहीये. मी फक्त वेळेमुळे थोडा ब्रेक घेत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा शो करतो आहे. यामुळे कुटुंबाला वेळ देता येत नाही. मला माझ्या कुटुंबाला चांगला वेळ द्यायचा आहे. यामुळे मी थोडीशी विश्रांती घेत आहे. इतर काही महत्वाच्या गोष्टींवर मला लक्ष द्यायचे आहे.