चारू असोपा हिने परत केले सुष्मिता सेनच्या भावावर अत्यंत गंभीर आरोप
काही दिवसांपूर्वीच चारू असोपा तिच्या मुलीसोबत दुसऱ्या घरामध्ये शिफ्ट झालीये.
मुंबई : अभिनेत्री सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेन आणि त्याची बायको चारू असोपा हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. चारू असोपा हिने राजीव सेनवर काही दिवसांपूर्वी अत्यंत गंभीर आरोप केले होते. त्यानंतर राजीव यानेही चारूवर आरोप केले. इतकेच नाही तर गर्भवती असताना राजीव मला धोका देत असल्याने चारूने म्हटले होते. हे दोघे सातत्याने आरोप-प्रत्यारोप करत आहेत. काही दिवसांपूर्वीच चारू असोपा तिच्या मुलीसोबत दुसऱ्या घरामध्ये शिफ्ट झालीये. इतकेच नाही तर ती ज्या घरामध्ये सध्या राहत आहे ते संपूर्ण घर देखील तिने चाहत्यांना दाखवले आहे.
नुकताच चारू असोपा हिने परत एकदा राजीव सेनवर गंभीर आरोप केले आहेत. माझा आणि माझ्या मुलाचा वापर राजीव करत असल्याने तिने म्हटले आहे. चारू असोपा म्हणाली की, कॉन्टेक्टसाठी राजीव आमचे नाव वापरत आहे.
राजीव सेन आणि चारू असोपा यांच्या मुलीचे नाव जियाना असे आहे. राजीव गेल्या काही दिवसांपासून मला मेसेज करत असल्याचे देखील चारू असोपा हिने म्हटले आहे. गुड माॅर्निंग आणि गुड नाईटचे मेसेज मला राजीव पाठवत असल्याने तिने सांगितले.
मला सुरूवातीला वाटले की, त्याच्या मनात काहीतरी चांगले सुरू आहे. परंतू काही दिवसांनंतर लक्षात आले की हा फक्त कॉन्टेक्टसाठी हे सर्व करत आहे. त्याच्या डोक्यात काहीतरी खिचडी सुरू असल्याचे कळाले.
चारू असोपा पुढे म्हणाली की, माझा आणि माझी मुलगी जियानाच्या नावाचा वापर करून त्याच्या यूट्यूब ब्लाॅग्सवर व्ह्यूज वाढवण्याचा तो प्रयत्न करत आहे. राजीव सेनसोबत झालेल्या वादानंतर चारू असोपा चर्चेत आलीये.
चारू असोपाने राजीव सेनचे घर सोडले असून सध्या ती तिच्या मुलीसोबत मुंबईमध्ये राहते आहे. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. राजीव याने चारूवर गंभीर आरोप करत म्हटले होते की, तिचे अफेअर बाहेर सुरू आहे.