रणवीर सिंह याच्या सर्कस चित्रपटाची धमाकेदार ओपनिंग नाहीच, रोहित शेट्टीला मोठा झटका

रणवीर सिंहचे दोन चित्रपट फ्लाॅप गेले आहेत. रणवीरच्या सर्कस या चित्रपटाकडून प्रचंड अपेक्षा होत्या.

रणवीर सिंह याच्या सर्कस चित्रपटाची धमाकेदार ओपनिंग नाहीच, रोहित शेट्टीला मोठा झटका
Follow us
| Updated on: Dec 24, 2022 | 3:30 PM

मुंबई : अभिनेता रणवीर सिंह याचा बहुचर्चित सर्कस हा चित्रपट काल म्हणजेच 23 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. रोहित शेट्टीचा चित्रपट म्हटल्यावर बाॅक्स आॅफिसवर 100 टक्के धमाका होतो म्हणजे होतोच. रोहित शेट्टीचा 14 वर्षांपूर्वी संडे हा एकच चित्रपट फ्लाॅप गेला होता. शक्यतो रोहित शेट्टीचे चित्रपट फ्लाॅप जात नाहीत. मात्र, कोरोनानंतर बाॅलिवूडचे चित्रपट मोठ्या प्रमाणात फ्लाॅप जाताना दिसत आहेत. कोरोनानंतर रिलीज झालेले रणवीर सिंहचे दोन चित्रपट फ्लाॅप गेले आहेत. रणवीरच्या सर्कस या चित्रपटाकडून प्रचंड अपेक्षा होत्या, इतकेच नाहीतर रोहित शेट्टी याने चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये काहीच कमी सोडली नव्हती. परंतू हे सर्व असताना देखील सर्कस चित्रपटाची धमाकेदार ओपनिंग झाली नाहीये.

रोहित शेट्टीचे जास्त चित्रपट हे काॅमेडीवर आधारित असतात. सर्कस चित्रपट देखील काॅमेडीवरच आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्येही काहीच कमी सोडण्यात आली नाहीये.

कपिल शर्मा शोपासून ते बिग बाॅसपर्यंत सर्वत्र प्रमोशन करण्यात आले. रोहित शेट्टीच्या दहा वर्षांमधील चित्रपटाच्या तुलनेत सर्कस चित्रपटाची ओपनिंग सर्वात कमी ठरलीये.

सर्कस या चित्रपटाची ओपनिंग धमाकेदार होण्याची अपेक्षा होती. परंतू असे होऊ शकले नाहीये. चित्रपटाची ओपनिंग साधारणच राहिली आहे. या चित्रपटाने ओपनिंग डेला 7.5 कोटी ते 8.5 पर्यंत कमाई केलीये. हा आकडा रोहित शेट्टीच्या इतर चित्रपटाच्या तुलनेत फारच कमी आहे.

असा एक अंदाजा होता की, सर्कस हा चित्रपट ओपनिंग डेलाच 10 कोटींच्या पुढे बाॅक्स ऑफिस कलेक्शन करेल. मात्र, असे होऊ शकले नाहीये. आता शनिवार आणि रविवारचा फायदा हा चित्रपटाला होण्याची शक्यता आहे.

रणवीर सिंहचे 83 आणि जयेशभाई जोरदार हे दोन चित्रपट बॉक्स ऑफिस पर फ्लॉप गेले आहेत. मात्र, या चित्रपटामध्ये रणवीर सिंहच्या अभिनयाचे काैतुक केले जात होते. परंतू सर्कस चित्रपटामधील रणवीरच्या अभिनयाचे काैतुक केले जात नाहीये.

भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....