अखेर काय म्हणाले चेतन भगत उर्फी जावेद हिच्याबद्दल, वाचा सविस्तरपणे
ओटीटी बिग बाॅसमधून उर्फीला खरी ओळख मिळालीये. काही दिवसांपूर्वी तर उर्फीने चक्क सिम कार्डचा एक हडके ड्रेस घातला होता.
मुंबई : टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. तिच्या विचित्र स्टाईलने अनेकदा तिच्यावर टीकाही केली जाते. मात्र, याचा काहीही परिणाम उर्फीवर होत नाही. अनेकदा तिच्यावर टीका करणाऱ्यांचा चांगलाच समाचार देखील उर्फी घेते. ओटीटी बिग बाॅसमधून उर्फीला खरी ओळख मिळालीये. काही दिवसांपूर्वी तर उर्फीने चक्क सिम कार्डचा एक हडके ड्रेस घातला होता. आता प्रसिध्द लेखक चेतन भगत यांनी साहित्य आज तकच्या मंचावर उर्फीबद्दल मोठे विधान केले आहे.
चेतन भगत म्हणाले की, उर्फी जावेद तिचे करिअर सेट करत आहे, ते काही चुकीचे नाहीये. आज लोक तिचे फोटो पाहतात आणि लाईकही करतात. इतकेच नाही तर बिस्तरमध्ये घुसून लोक तिचे फोटो पाहतात. मोबाईल, नेट यासर्व गोष्टी चांगल्याच आहेत.
तरूण मुले कितीतरी वेळ या मोबाईलवर घालवतात. हे त्यांचे पुस्तके वाचण्याचे वय आहे, हे अनेकदा ते विसरून जातात. इंटरनेट बरोबर आहे. परंतू युवा पिढी यामुळे कमजोर होताना दिसत आहे.
पूर्ण दिवस मुले मोबाईलवर रिल्स आणि फोटो पाहतात. त्यामध्ये त्यांचा प्रचंड असा वेळही जातो. इतकेच नाही तर चेतन भगत पुढे म्हणाली की, मला उर्फीचे सर्वच ड्रेस माहिती आहेत.
आज सकाळीच मी स्वत: उर्फीचा नवा ड्रेस पाहून आलोय, तिने मोबाईलचा ड्रेस म्हणून वापर केला आहे. शेवटी मुलांना सल्ला देताना चेतन भगत म्हणाले की, मुलांनी पुस्तके वाचण्यात अधिक वेळ घालायला हवा.
उर्फी जावेद गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेचा विषय नक्कीच बनली आहे. उर्फी ज्वलंत विषयांवर अनेकदा आपले विचार ठेवते. काही दिवसांपूर्वी तिने जया बच्चन यांच्यावरही टीका केली होती.