आई तू खरोखरच मरणार आहेस…?; 9 वर्षाच्या मुलीचा अभिनेत्रीला काळीज चिरणारा सवाल, असं का विचारलं?
छवि मित्तल आणि तिचा पती मोहित हुसैन यांनी एका मुलाखतीत त्यांच्या आयुष्यातील या कठिण प्रसंगावर भाष्य केलं होतं. विशेष म्हणजे आपल्याला कॅन्सर झालाय ही माहिती सर्वात आधी तिलाच सर्वात आधी मिळाली होती, असं छविने सांगितलं. माझा नवरा परिस्थिती समजत होता. पण माझी मुलगी अरीजा फक्त 9 वर्षाची होती. तिला ही गोष्ट सांगणं तसं कठीण होतं.
मुंबई | 27 डिसेंबर 2023 : अभिनेत्री छवि मित्तल कॅन्सरमधून पूर्णपणे बरी झाली आहे. तिला ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. हा कॅन्सर सुरुवातीच्या स्टेजवरचा होता. वेळेत याची माहिती मिळाली. त्यामुळे पटकन इलाज करता आला. सहा तासाचं ऑपरेशन झालं आणि छवि या जीवघेण्या आजारातून बाहेर पडली. पण जेव्हा छविला कॅन्सर झाल्याचं निदान झालं. तेव्हा तिच्या घरातील वातावरण एकदम बदलून गेलं. घरातील लोक टेन्शनमध्ये आले होते. छविचं काय होणार? असाच प्रश्न प्रत्येकाच्या मनात होता. छविच्या लाडक्या लेकीलाही या प्रश्नाने ग्रासले होते. मुलीने थेट आईलाच त्याबाबतचा प्रश्न केला होता. आई तू खरोरखरच मरणार आहेस का?, असा काळीज चिरणारा सवाल तिने केला होता.
छवि मित्तल आणि तिचा पती मोहित हुसैन यांनी एका मुलाखतीत त्यांच्या आयुष्यातील या कठिण प्रसंगावर भाष्य केलं होतं. विशेष म्हणजे आपल्याला कॅन्सर झालाय ही माहिती सर्वात आधी तिलाच सर्वात आधी मिळाली होती, असं छविने सांगितलं. मलाच आजाराबाबतची सर्वात आधी माहिती मिळाली. कारण मी डॉक्टरांच्या संपर्कात होते. डॉक्टरांनीच मला सर्वात आधी फोन केला होता. रिपोर्ट आलेत. पण मला ते चांगले वाटत नाहीत, असं मी डॉक्टरांना सांगितलं. त्यावर डॉक्टरांनी फक्त माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, ठीक आहे, आपण त्यावरही मात करू, असं छविने सांगितलं.
तू मरणार आहेस?
माझा नवरा परिस्थिती समजत होता. पण माझी मुलगी अरीजा फक्त 9 वर्षाची होती. तिला ही गोष्ट सांगणं तसं कठीण होतं. जेव्हा माझ्या आजाराची माहिती माझ्या मुलीला समजली. तेव्हा मी मरणार आहे, असं तिला वाटलं. आई, तू मरणार आहेस का? असं तिने मला विचारलं. त्यावर मी मुलीला समजावलं. कॅन्सर प्रत्येकासाठी एक सारखा नसतो हे तिला समजावलं, असं तिने सांगितलं.
अन् पोरगी रडायला लागली
मी अरीजाशी बोलले. मी तिच्याजवळ बसले होते. तिला म्हणाले, तुझी आई आजारी आहे. तिला काही दिवस रुग्णालयात राहावे लागेल. ती बरी होईल आणि परत घरी येईल. माझे हे बोल ऐकताच ती अचानक रडू लागली. मम्मा, तुला काही झालंय का? असा काळीज चिरणारा सवाल तिने केला. ती कॅन्सरबाबत विचारत होती हे मला माहीत होतं. मीही तिला हो म्हणून सांगितलं.
तू जेवणार नाहीस का?
कॅन्सरमुळे माणसाचा मृत्यू होतो, एवढंच माझ्या मुलीला माहीत होतं. माझ्या आजाराची माहिती मिळाल्यानंतर ती म्हणाली, तू जेवणार नाहीस का? तू मरणार आहेस काय? मी म्हणाले, नाही. असं काही नाही. प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या प्रकारचा कॅन्सर होतो. माझ्यासाठीही वेगळा आहे. ही केवळ एक क्षुल्लक गोष्ट आहे. ते सर्जरी करतील आणि बाहेर काढतील.