उद्योगपतीच्या अंत्यसंस्कारामध्ये रडण्यासाठी 5 लाख !, चंकी पांडेंना मिळालेल्या ऑफरचं पुढे काय झालं ?

चंकी पांडे हे चित्रपट क्षेत्रातील नावाजलेला चेहरा असल्यामुळे त्यांना एका उद्योगपतीच्या अंत्यसंस्कारमध्ये चक्क रडण्याची ऑफर आली होती. (chunky pandey businessman funeral)

उद्योगपतीच्या अंत्यसंस्कारामध्ये रडण्यासाठी 5 लाख !, चंकी पांडेंना मिळालेल्या ऑफरचं पुढे काय झालं ?
chunky-pandey
Follow us
| Updated on: May 06, 2021 | 11:06 PM

मुंबई : असं म्हणतात की बॉलिवूड हे एक मायाजाल आहे. बॉलिवूडमध्ये रोज वेगवेगळ्या घटना घडतात. यातील काही घटना या धक्कादायक असतात. तर काही घटनांमुळे आपण चिकत होतो. सध्या बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता चंकी पांडे (ChunkyPandey) यांनी एक चकीत करणारा किस्सा सांगितला आहे. चंकी पांडे हे चित्रपट क्षेत्रातील नावाजलेला चेहरा असल्यामुळे त्यांना एका उद्योगपतीच्या अंत्यसंस्कारामध्ये  चक्क रडण्याची ऑफर आली होती. हा किस्सा सांगितल्यानंतर अनेकजण अवाक् झाले आहेत. (Chunky Pandey reveals he was offered 5 Lakh rupees only for crying in businessman funeral)

रडण्यासाठी तब्बल 5 लाखांची ऑफर

चंकी पांडे यांनी मुंबई मिरर या इंग्रजी वृत्तपत्राला एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत चंकी पांडे यांच्यासोबत 2009 साली घडलेला एक मजेदार किस्सा त्यांनी सांगितला आहे. त्यांचा हा किस्सा ऐकून हसावं की रडावं अशी अनेकांची स्थिती आहे. त्यांनी सांगितल्यानुसार 2009 साली चंकी पांडे यांच्याशी एका व्यक्तीने संपर्क साधला. त्यानंतर त्या व्यक्तीने चंकी पांडे यांना एका उद्योगपतीच्या अंत्यसंस्कारासाठी अपस्थित राहण्याची विनंती केली. तसेच यावेळी उद्योगपतीचे अंत्यसंस्कार तसेच अंत्ययात्रा होत असताना बाजूला उभे राहून फक्त रडण्याची ऑफर या माणसाने चंकी पांडे यांना दिली. विशेष म्हणजे उभे राहून फक्त रडण्यासाठी चंकी पांडे यांना 2009 साली तब्बल 5 लाख रुपये देण्यात येणार होते.

चिंकी पांडे यांनी ऑफर नाकारली

फक्त रडण्यासाठी 5 लाखांची ऑफर मिळाल्यानंतर नेमकं काय करावं हे चंकी पांडे यांना सुरुवातीला समजलंच नाही. त्यानंतर आणखी खोलात जाऊन विचारल्यानंतर काही गोष्टी समोर आल्या. मृत्यू झालेल्या उद्योपतीसोबत बॉलीवूडमधील बड्या हस्तींचे आर्थिक संबंध होते, असे मृत उद्योगपतीच्या नातेवाईकांना दाखवायचे होते. मृत्यू झालेल्या उद्योगपतीने बॉलिवूडमध्येसुद्धा पैसे गुंतवलेले आहेत, हे लोकांना दाखवायचे होते. त्यामुळे चंकी पांडे यांना फक्त रडण्यासाठी 5 लाख रुपये देण्यात येणार होते. मात्र, चंकी पांडे यांनी पैशांना न भाळता ही ऑफर धुडकावून लावली होती.

चंकी पांडेंनी दुसऱ्या अभिनेत्याला पाठवले

चंकी पांडे यांनी रडण्याची ऑफर धुडकावल्यानंतरसुद्धा मृत्यू झालेल्या उद्योगपतीचे आप्त स्वकीय खूप आग्रह करत होते. त्यामुळे चंकी पांडे यांनी त्यांच्या जागेवर रिप्लेसमेंट म्हणून दुसऱ्या एका अभिनेत्याला फक्त रडण्यासाठी पाठवले होते. दरम्यान, हे सांगताना चंकी पांडे यांनी उद्योगपतीच्या अंत्यसंस्कासाठी गेलेल्या अभिनेत्याचे नाव सांगितले नाही. पण हा किस्सा समोर आल्यानंतर अनेकांना नेमकी काय प्रतिक्रिया द्यावी हे समजलेले नाही. मात्रस चंकी पांडे यांनी हा किस्सा दिलखुलासपणे सांगितल्यामुळे अनेकांनी त्यांची वाहवा केली आहे.

इतर बातम्या :

Indian Idol 12 | अरुणिताच्या आवाजाचे फॅन झाले अमित कुमार, शेअर केला किशोर कुमारांचा जुना किस्सा

गोव्यात मालिकांचं शूटिंग बंद, मुख्यमंत्र्यांचा निर्णय, ‘सूर नवा..’, ‘अग्गंबाई सूनबाई’सह अनेक मालिका अडचणीत

Video | बेडरूममध्ये फारशी साफ करतेय ‘हरयाणवी क्वीन’ सपना चौधरी, लेकाचीही दिसली झलक, पाहा व्हिडीओ

(Chunky Pandey reveals he was offered 5 Lakh rupees only for crying in businessman funeral)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.