Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंजाबी गायक मनकिरत औलख यांना मूसवाला खून प्रकरणात क्लीन चिट, सोशल मीडियावर दिली माहिती!

सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर पंजाब हादरले आहे. लॉरेन्स बिश्नोईकडून अनेकांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या, तर अनेक लोक या हत्येच्या प्रकरणात सामील असल्याच्या अफवांही पसरल्या. ज्यामध्ये मनकीरत औलख हे मोठे नाव पुढे आले. नुकताच मनकिरत औलखने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे.

पंजाबी गायक मनकिरत औलख यांना मूसवाला खून प्रकरणात क्लीन चिट, सोशल मीडियावर दिली माहिती!
Image Credit source: इंस्टाग्राम
Follow us
| Updated on: Jun 25, 2022 | 9:59 AM

मुंबई : फक्त पंजाबच नाही तर संपूर्ण देश प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसवालाच्या (Sidhu Moose wala) हत्येनंतर हादरला. मूसवाला यांच्या हत्येबाबत एकामागून एक नवीन अपडेट्स समोर येत आहेत. या प्रकरणात अनेकांची नावे पुढे आली, त्यापैकी एक नाव म्हणजे पंजाबी गायक मनकिरत औलख (Singer Mankirat Aulakh) यांचेही होते. मात्र, ही फक्त एक अफवाच असल्याचे आता पुढे आले आहे. यासंदर्भात स्वत: मनकिरत औलख यांनी एक पोस्ट सोशल मिडियावरती शेअर केलीयं. तसेच ही पोस्ट शेअर (Post Share) करताना मनकीरत औलख यांनी एक मागणीही केली. गायक मूसवाला हत्ये प्रकरणात नाव आल्यानंतर मनकिरत यांना मोठा त्रास सहन करावा लागला होता.

इथे पाहा मनकिरत औलखने शेअर केलेली पोस्ट

Mankirt Aulakh

लॉरेन्स बिश्नोईकडून अनेकांना जीवे मारण्याच्या धमक्या

सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर पंजाब हादरले आहे. लॉरेन्स बिश्नोईकडून अनेकांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या, तर अनेक लोक या हत्येच्या प्रकरणात सामील असल्याच्या अफवांही पसरल्या. ज्यामध्ये मनकिरत औलख हे मोठे नाव पुढे आले. नुकताच मनकिरत औलखने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मनकिरतने आपल्या इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत फेक मीडियासा टार्गेट केले. ज्याने त्याच्याबद्दल अनेक अफवा पसरवल्या. या पोस्टमध्ये मनकिरतने शेअर केले आहे की, मूसेवाला खून प्रकरणात त्याला क्लीन चिट मिळाली आहे.

हे सुद्धा वाचा

पंजाबी गायक मनकिरत औलखने शेअर केली पोस्ट

मनकिरत आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटंले आहे की, लोकांना बदनाम करण्याचे काम करणाऱ्या फेक मीडियावर बहिष्कार टाकायला हवा. कोणतीही गोष्ट जर आपल्याला पुर्णपणे माहिती नसताना एखाद्याला दोषी ठरवू नये. असे या पोस्टच्या माध्यमातून मनकिरतने सांगण्याचा प्रयत्न केलायं. रिपोर्ट्सनुसार, पंजाबी इंडस्ट्रीसह बॉलिवूडही गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या निशाण्यावर आहे. गायक मनकिरत औलखने शेअर केलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसते आहे. त्याच्या पोस्टमध्ये सिद्धू मुसेवाला यांच्या आत्म्याला शांती मिळावी अशी प्रार्थना केली तसेच मुसेवालाला न्याय मिळावा अशी मागणी देखील मनकिरतने केली आहे.

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.