Kapil Sharma | कपिल शर्मा याची चांदीच चांदी, या मोठ्या बाॅलिवूड चित्रपटामधून करणार धमाका
अक्षय कुमार हा तर त्याचा प्रत्येक चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावत आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करतो.
मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्मा (Kapil Sharma) हे गेल्या काही वर्षांपासून सतत चर्चेत राहणारे एक नाव आहे. द कपिल शर्मा या शोच्या माध्यमातून कपिल शर्मा हा चाहत्यांचे सतत मनोरंजन करतो. विशेष म्हणजे बाॅलिवूडचे कलाकार देखील या शोमध्ये कायमच हजेरी लावतात. इतकेच नाहीतर बाॅलिवूडचा (Bollywood) कोणताही चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर कपिल शर्माच्या शोमध्ये चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी संपूर्ण टीम दाखल होते. आतापर्यंत बाॅलिवूडच्या जवळपास सर्वच कलाकारांनी या शोमध्ये हजेरी लावली आहे. अक्षय कुमार हा तर त्याचा प्रत्येक चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावत आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करतो. कपिल शर्मा आणि त्याची खास टीम जबरदस्त कॉमेडी करत सर्वांना हसवते.
गेल्या काही दिवसांपासून कपिल शर्मा हा कॉमेडीसोबतच बाॅलिवूडच्या चित्रपटांमध्ये देखील प्रेक्षकांना हसवण्यासाठी येतो. इतकेच नाहीतर एका वेब सीरिजमध्येही कपिल शर्मा याने धडाकेबाज भूमिका केलीये.
कपिल शर्मा याची सोशल मीडियावर फॅन फाॅलोइंग देखील जबरदस्त आहे. आता कपिल शर्मा याच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. कारण लवकरच एका बाॅलिवूड चित्रपटामध्ये कपिल शर्मा हा महत्वाच्या भूमिकेमध्ये असणार आहे.
चित्रपट दिग्दर्शक राज शांडिल्य यांच्या चित्रपटामध्ये कपिल शर्मा हा दिसणार असून याबद्दल स्वत: राज शांडिल्य यांनी माहिती दिलीये. म्हणजेच काय तर येणाऱ्या काळामध्ये कपिल शर्मा याची चांदीच चांदी असणार आहे.
नुकताच पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीमध्ये राज शांडिल्य यांनी म्हटले की, आम्ही यावर आता सर्व चर्चा करत आहोत. आम्हाला असे काही करायचे आहे की, जे यापूर्वी कधीच झाले नाहीये…
नक्कीच आम्ही एक चित्रपटसोबत करणार आहोत…या चित्रपटाला भूषण कुमार हे प्रोड्यूस करणार आहेत. आमचे बोलणे सध्या सुरू आहे. यामुळेच आता हे नक्की आहे की, काॅमेडीनंतर कपिल शर्मा हा चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी तयार आहे.
कपिल शर्मा हा काही दिवसांपूर्वीच सहकुटुंब पंजाबला गेला होता. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला होता. आता कपिल शर्मा याच्या बाॅलिवूड पदार्पणाची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत.