तालिबानी टेररची थेट हिंदुत्वाशी तुलना, #ArrestSwaraBhasker ट्रेंड करत स्वरा भास्कर पुन्हा सोशल मीडियावर ट्रोल!
बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती प्रत्येक मुद्द्यावर आपले मत व्यक्त करायला अजिबात धजत नाही. आपल्या बेधडक शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या स्वरा भास्करला यावेळी आपले मत व्यक्त करणे महागात पडले आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती प्रत्येक मुद्द्यावर आपले मत व्यक्त करायला अजिबात धजत नाही. आपल्या बेधडक शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या स्वरा भास्करला यावेळी आपले मत व्यक्त करणे महागात पडले आहे. स्वराने अलीकडेच तालिबानी दहशतवाद्यांबद्दल ट्विट केले, त्यानंतर ‘#ArrestSwaraBhasker’, ‘#SwaraBhasker’ ट्विटरवर ट्रेंड होत आहे.
स्वरा भास्करने अफगाणिस्तानमधील परिस्थितीबद्दल ट्विट केले. तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबूल ताब्यात घेतली आहे. स्वराने अफगाणिस्तानच्या या स्थितीची भारताशी तुलना केली आहे, ज्यामुळे तिला अटक करण्याची मागणी सोशल मीडियावर जोर धरत आहे.
स्वरा भास्करने ट्वीट केले की, ‘आम्ही हिंदुत्व दहशतवादाशी ठीक असू शकत नाही आणि तालिबानी दहशतवादामुळे प्रत्येकजण हैराण आणि उद्ध्वस्त झाला आहे. आपण तालिबानच्या दहशतीसह शांत बसू शकत नाही आणि मग हिंदुत्वाच्या दहशतीबद्दल राग येऊ शकतो. आपली मानवी आणि नैतिक मूल्ये दडपलेल्यांच्या ओळखीवर आधारित नसावीत.’
सोशल मीडियावर ट्रोल
या ट्विटनंतर स्वरा भास्करच्या अडचणी वाढल्या आहेत. सोशल मीडियावर लोक या ट्विटबद्दल संताप व्यक्त करत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले – ‘स्वरा भास्करला अटक करा, तिने आमच्या भावना दुखावल्या आहेत.’
#ArrestSwaraBhasker #ArrestSwaraBhasker @ReallySwara Should be arrested and sent to Afganistan so that she can be hosted by talibanis. Then she will know difference between Indian and Talibanis.
Today in our country’s film industry’s illiteracy is at same level as of pic.twitter.com/GlVXuXtvqE
— Hopping Bug (@was_chaos) August 18, 2021
Some one kindly file FIR against her. #ArrestSwaraBhasker
— hari choudhary (@haricho65504061) August 18, 2021
#ArrestSwaraBhasker for defaming our religion, making false allegations, spreading haterate & anger among public on social media & hurting ones religious & ideological sentiments . @DGPMaharashtra @CPMumbaiPolice @MumbaiPolice @MahaCyber1 @Cyberdost pic.twitter.com/mxsxOqA3Ui
— Hindunews456 (@Hindunews456H) August 18, 2021
दुसरीकडे, दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले – ‘स्वरा भास्करला हिंदुत्वाचा अपमान केल्याबद्दल अटक करा. हिंदूंनी कधीही कोणतेही दहशतवादी कृत्य केले नाही.’
#ArrestSwaraBhasker@ReallySwara every day … pic.twitter.com/KvNUe6hww8
— Awesome Abhishek (@AwesomeAbhishe7) August 18, 2021
We are demand Arrest Swara Bhaskar.
Demand you?
RT if agree! #ArrestSwaraBhasker pic.twitter.com/frIBQp1FaP
— Amit Kalraj (@AKalraj_) August 18, 2021
#ArrestSwaraBhasker pls ensure this is happening
— Sriram Balasubramaniam ?? (@bsriram78) August 18, 2021
काही वापरकर्ते स्वरा यांचे खाते निलंबित करण्याची मागणी करत आहेत. त्याचबरोबर काही लोक स्वराविरोधात एफआयआर नोंदवण्याची मागणी करत आहेत. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, स्वरा भास्करच्या अनेक वेब सीरीज प्रदर्शित झाल्या आहेत. ती शेवट ‘भाग बीनी भाग’ या सीरीजमध्ये दिसली होती. ही सीरीज नेटफ्लिक्सवर प्रसिद्ध झाली होती.
हेही वाचा :
‘सैराट’च्या ‘आर्ची’ची मोठी झेप, अभिनेत्री रिंकू राजगुरू दिसणार नेटफ्लिक्सच्या आगामी चित्रपटात!