Aditya Pancholi : अभिनेता आदित्य पांचोली विरोधात तक्रार दाखल, शिवीगाळ, मारहाण केल्याचा आरोप

अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गैरवर्तणुकीचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.

Aditya Pancholi : अभिनेता आदित्य पांचोली विरोधात तक्रार दाखल, शिवीगाळ, मारहाण केल्याचा आरोप
आदित्य पांचोली
Follow us
| Updated on: Feb 09, 2022 | 5:16 PM

मुंबई : अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात (Aditya Pancholi) पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गैरवर्तणुकीचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. चित्रपट निर्माते सॅम फर्नांडिस (Sam Fernandes) यांनी ही तक्रार दिली आहे. मुंबईतील जुहू पोलीस ठाण्यात (juhu police station) त्यांनी तक्रार दाखल केली आहे. आदित्या पांचोलीने हॉटेलमध्ये शिवीगाळ केली, धमकी दिली तसंच मारहाण केल्याचा आरोप सॅम फर्नांडिस यांचा आहे. तसंच आदित्यने आपला मुलगा सूरज पांचोलीला (Sooraj Pancholi) ‘हवा सिंग’ या चित्रपटात कायम ठेवण्याबाबत दबाव टाकल्याचाही आरोप सॅम यांच्याकडून करण्यात आला आहे. त्यामुळे आदित्य पांचोलीच्या अडचणीत वाढ झाली आहे.

आदित्य पांचोलीविरोधात तक्रार दाखल चित्रपट निर्माते सॅम फर्नांडिस यांनी ही तक्रार दिली आहे. याच त्यांनी आदित्य विरोधात गंभीर आरोप केले आहेत. आदित्य पांचोलीने हॉटेलमध्ये शिवीगाळ केली, धमकी दिली तसंच मारहाण केल्याचा आरोप सॅम फर्नांडिस यांचा आहे. तसंच आदित्यने आपला मुलगा सूरज पांचोलीला ‘हवा सिंग’ या चित्रपटात कायम ठेवण्याबाबत दबाव टाकल्याचाही आरोप सॅम यांच्याकडून करण्यात आला आहे. सॅम यांनी आपल्या तक्रारीत म्हटलंय,”मी 2019 मध्ये सूरजसोबतच्या एका चित्रपटाची घोषणा केली होती. त्याने 12 दिवस शूटिंग केलं. पण पहिल्या लॉकडाऊननंतर गोष्टी जरा कठीण झाल्या. सूरजसोबत चित्रपट बनवण्यास प्रोड्युसरने नकार दिला. मी सूरजशी बोललो आणि त्याने मला सांगितले की मी दुसऱ्या एखाद्या अभिनेत्यासोबत चित्रपट बनवू शकतो” , असं सॅम फर्नांडिस म्हणाले.

“सूरजचे वडील आदित्य पांचोली म्हणाले की आपण सूरजसोबतच काम करू आणि मी इन्वेस्टर्स आणेल. पण तसं झालं नाही. त्यांनी चित्रपटासाठी काही पैसे दिले. पण ते पुरसे नव्हते. हा चित्रपट भारताच्या हेवीवेट बॉक्सरचा बायोपिक आहे आणि त्यासाठी आम्हाला 25 कोटींचे बजेट हवे आहे”, असंही सॅम म्हणाले.

‘मला भेटायंचं असल्याचं आदित्यने सांगितलं आणि हॉटेलमध्ये बोलावलं. त्या खोलीत जास्त माणसं असल्यामुळे आम्ही कॉरिडॉरमध्ये जाऊन बोललो. त्यानंतर काही वेळाने ते म्हणाले की एकतर मी त्यांच्या मुलाला चित्रपटात घ्या. अन्यथा हा चित्रपट होऊ देणार नाही. यानंतर त्याने मला शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. मी निघायला लागलो तेव्हा त्याने मला मागून लाथ मारली. यानंतर मी थेट पोलीस ठाण्यात फोन करून त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली, असं सॅम यांनी सांगितलं आहे. पोलिसात तक्रार दाखल झाल्याने आदित्य पांचोलीच्या अडचणी वाढल्या आहेत.

संबंधित बातम्या

disha rahul photos : राहुल वैद्य आणि दिशा परमार यांची लेट पण थेट संक्रात साजरी, फोटो एकदा बघाच!

Lock Upp : कंगना रनौतच्या ‘लॉकअप’मध्ये शहनाझ गिल येणार?

डॅशिंग दीपिकाचा बोल्ड लुक, गेहराईयाँच्या प्रमोशनसाठी खास ड्रेसची चॉईस, आतापर्यंतचे 4 टॉप फोटो

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.