Ranbir Alia Wedding: ठरलं! रणबीर-आलियाच्या लग्नाची तारीख आली समोर; मुंबईत ‘या’ ठिकाणी बांधणार लग्नगाठ

अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या लग्नाच्या चर्चा गेल्या वर्षभरापासून आहेत. अखेर ही जोडी कधी विवाहबद्ध होणार, याबद्दलची माहिती समोर आली आहे. 'इंडिया टुडे'नं दिलेल्या वृत्तानुसार, रणबीर-आलिया हे या एप्रिल महिन्यातच लग्नगाठ बांधणार आहेत.

Ranbir Alia Wedding: ठरलं! रणबीर-आलियाच्या लग्नाची तारीख आली समोर; मुंबईत 'या' ठिकाणी बांधणार लग्नगाठ
Ranbir Kapoor and Alia BhattImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 03, 2022 | 9:42 AM

अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या लग्नाच्या चर्चा गेल्या वर्षभरापासून आहेत. अखेर ही जोडी कधी विवाहबद्ध होणार, याबद्दलची माहिती समोर आली आहे. ‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार, रणबीर-आलिया हे या एप्रिल महिन्यातच लग्नगाठ बांधणार आहेत. या लग्नसोहळ्याला मोजके कुटुंबीय आणि जवळचे मित्रमैत्रिणी उपस्थित राहणार असल्याचं कळतंय. बॉलिवूडमधील बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित असा हा लग्नसोहळा असेल. गेल्या काही वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत. रणबीर-आलियाने अनेकदा माध्यमांसमोरही खुलेपणाने एकमेकांविषयीचं प्रेम व्यक्त केलं आहे. आता ही जोडी लवकरच आपल्या आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. या दोघांच्या कुटुंबीयांनीही लग्नाच्या तयारीला सुरुवात केल्याचं समजतंय. (Bollywood Wedding)

रणबीरची आई नीतू कपूर यांनी नुकतीच सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा यांच्या स्टोअरला भेट दिली. तर काही वेळा मनिष यांनासुद्धा कपूर कुटुंबीयांना भेट देताना पाहिलं गेलं. रणबीर आणि आलियाने नुकतंच त्यांच्या आगामी ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली. त्यानंतरच्या प्रोजेक्ट्ससाठी होणाऱ्या शूटिंगच्या तारखाही त्यांनी लग्नसोहळ्याच्या हिशोबाने ठरवल्या असल्याचं कळतंय. एप्रिल महिन्यात जरी रणबीर-आलिया लग्नगाठ बांधणार असल्याचं वृत्त असलं तरी अद्याप त्यांच्या लग्नाची निश्चित तारीख समोर आलेली नाही. मात्र मुंबईतील चेंबूर इथल्या आरके हाऊसमध्ये हे दोघं लग्न करणार असल्याचं समजतंय. याआधी रणबीर आणि आलिया हे उदयपूरमध्ये लग्न करणार असल्याची चर्चा होती. मात्र कपूर आणि भट्ट कुटुंबीयांना मुंबईतच हा लग्नसोहळा पार पाडायचा आहे.

आलियाची इन्स्टा पोस्ट-

अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नसोहळ्यात पहिल्यांदा रणबीर-आलियाने एकत्र हजेरी लावली होती. तेव्हापासून या दोघांमध्ये काहीतरी शिजत असल्याची चर्चा इंडस्ट्रीत सुरू झाली. या दोघांनी माध्यमांपासून आपलं रिलेशनशिप पुरेपूर लपवण्याचा काही काळ प्रयत्न केला. मात्र पुरस्कार सोहळ्यात, पार्ट्यांमध्ये अनेकदा सतत रणबीर-आलियाला एकत्र पाहिलं गेलं. ही जोडी आता लवकरच मोठ्या पडद्यावरही पहिल्यांदा एकत्र झळकणार आहे. ‘ब्रह्मास्त्र’ हा त्यांचा चित्रपट येत्या ९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

याशिवाय आलिया ‘डार्लिंग्ज’ आणि ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटांमध्ये भूमिका साकारताना दिसणार आहे. तर दुसरीकडे रणबीरचा ‘शमशेरा’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहे. यामध्ये तो वाणी कपूर आणि संजय दत्त यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. याशिवाय तो श्रद्धा कपूरसोबतही एका चित्रपटात काम करणार आहे.

हेही वाचा:

‘असले घाण आरोपही कोणी लावू नका’; म्हणत विशाखा सुभेदारने घेतला मोठा निर्णय

अडीच तासांचा शाहरुखचा Pathaan चित्रपट युट्यूबवर लीक? नेमकं काय आहे प्रकरण

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.