“‘द काश्मीर फाईल्स’मध्ये अर्धवट सत्य”; छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची टीका

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या सिनेमाला देशभरात टॅक्स फ्री (कर मुक्त) करण्याची मागणी केली आहे. "या सिनेमावरचा जीएसटी केंद्राने हटवावा. जेणे करून हा सिनेमा देशभर टॅक्स फ्री होईल", अशी विनंती त्यांनी पंतप्रधान मोदी यांना केली आहे.

'द काश्मीर फाईल्स'मध्ये अर्धवट सत्य; छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची टीका
भूपेश बघेल, द काश्मीर फाईल्स- सिनेमाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 17, 2022 | 7:09 PM

मुंबई : सध्या देशभरात दोन गट पडलेत. एक म्हणजे ‘द काश्मीर फाईल्स(The Kashmir Files)चं समर्थन करणारा गट आणि दुसरा म्हणजे ‘द काश्मीर फाईल्स’सिनेमाला विरोध करणारा गट. या सिनेमाच्या बाजूने बोला किंवा त्याच्या विरोधात बोला तुम्ही टीकेचे धनी होताच. अश्यात जर काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी ‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमाला टॅक्स फ्री करण्याची मागणी केल्यावर चर्चा तर होणारच ना… काँग्रेस नेते आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Chhatisgad CM Bhupesh Baghel) यांनी या सिनेमाला देशभरात टॅक्स फ्री (कर मुक्त) (The Kashmir Files Tax Free) करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भूपेश बघेल यांनी त्यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री आमदार आणि नागरिकांसोबतसोबत मॅग्नेटो मॉलमध्ये हा सिनेमा पाहिला.

‘द काश्मीर फाईल्स’ टॅक्स फ्री करा, भूपेश बघेल यांची मागणी

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या सिनेमाला देशभरात टॅक्स फ्री (कर मुक्त) करण्याची मागणी केली आहे. “या सिनेमावरचा जीएसटी केंद्राने हटवावा. जेणे करून हा सिनेमा देशभर टॅक्स फ्री होईल”, अशी विनंती त्यांनी पंतप्रधान मोदी यांना केली आहे.

सिनेमा पाहिल्यावर बघेल यांची प्रतिक्रिया

भूपेश बघेल यांनी सिनेमा पाहिल्यावर आपली प्रतिक्रिया दिली. “नुकतंच द काश्मीर फाइल्स सिनेमा बघून परतलो. भाजपच्या पाठिंब्याने चालणाऱ्या सरकारने काश्मिरी पंडितांना रोखण्याचा प्रयत्न केला नाही, तर त्यांना निघून जाण्यास सांगितलं, असं या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.तिथं सैन्य पाठवले नाही. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी लोकसभेचा घेराव केला तेव्हा सैन्य पाठवण्यात आलं”, असं भूपेश बघेल म्हणाले.

“भाजपचे नेते आले नाहीत”

“द काश्मीर फाईल्स’सिनेमा पाहण्यासाठी भूपेश बघेल यांनी सत्ताधारी आणि विरोधीपक्षातल्या सर्व आमदारांना त्यांनी आमंत्रित केलं होतं. पण निमंत्रण देऊनही भाजप आमदार हा सिनेमा पाहण्यासाठी आले नाहीत”, असं भूपेश बघेल म्हणालेत. तसंच “या सिनेमातून कोणताही संदेश दिला जात नाही. केवळ हिंसा दाखवण्यात आली आहे. सगळ्या गोष्टी अर्धवट दाखवण्यात आलं आहे”, असंही बघेल म्हणालेत.

या राज्यात ‘द काश्मीर फाईल्स’ टॅक्स फ्री

गुजरात, हरियाणा , कर्नाटक, मध्य प्रदेश, गोवा, त्रिपुरा आणि उत्तराखंड या राज्यातही ‘द काश्मीर फाईल्स’ टॅक्स फ्री करण्यात आला आहे. तसंच उत्तर प्रदेश राज्यातही ‘द काश्मीर फाईल्स’ हा सिनेमा टॅक्स फ्री करण्यात आला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तसे निर्देश दिले आहेत.

महाराष्ट्र-राजस्थानमध्ये टॅक्स फ्रीची मागणी

महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये सिनेमाला टॅक्स फ्री करण्याची मागणी करण्यात आली आहे. आता या पाठोपाठ भूपेश बघेल यांनी देशभरात हा सिनेमा टॅक्स फ्री करण्याची मागणी केली आहे.

संबंधित बातम्या

Shweta Bachchan Birthday : महानायक Amitabh Bachchan यांची लेक श्वेता बच्चन अभिनय नव्हे तर करते ‘हे’ काम…, वाचा…

Vidya Balan Photos : विद्या बालनचा ‘जलसा’ लूक, पाहा फोटो…

Video – नागपूरच्या सुदाम टॉकीजबाहेर नारेबाजी, BJP युवा मोर्च्याने जय श्री रामचे लावले नारे

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.