Love Story | विद्या बालनला पाहताच क्षणी तिच्या प्रेमात पडले सिद्धार्थ रॉय कपूर, ‘या’ प्रसिद्ध व्यक्तीमुळे जुळलं सूत!

सिद्धार्थ रॉय कपूरला केवळ चित्रपटसृष्टीत निर्माता म्हणून ओळखले जात नाही, तर विद्या बालनचे पती म्हणूनही त्याची ओळख आहे. अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) सिद्धार्थची तिसरी पत्नी आहे.

Love Story | विद्या बालनला पाहताच क्षणी तिच्या प्रेमात पडले सिद्धार्थ रॉय कपूर, ‘या’ प्रसिद्ध व्यक्तीमुळे जुळलं सूत!
विद्या-सिद्धार्थ
Follow us
| Updated on: Aug 03, 2021 | 9:30 AM

मुंबई : डिस्ने इंडियाचे माजी व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ रॉय कपूर (Siddharth Roy Kapur) यांनी 2019 च्या ‘द स्काय इज पिंक’ (The Sky Is Pink)  आणि 2020च्या नेटफ्लिक्स फिचर ‘ये बेले’ (Ye Belle) या चित्रपटांसह स्वत:ला ‘चिन्हांकित’ केले आहे. सिद्धार्थ रॉय कपूर अनेक टीव्ही वाहिन्यांचे संचालक आणि उपाध्यक्ष देखील होते. जरी सिद्धार्थच्या चित्रपटांबद्दल आणि त्याच्या कारकिर्दीबद्दल सर्वांना माहिती आहे, पण आज आपण त्यांच्या लव्ह लाईफबद्दल बोलणार आहोत…

सिद्धार्थ रॉय कपूरला केवळ चित्रपटसृष्टीत निर्माता म्हणून ओळखले जात नाही, तर विद्या बालनचे पती म्हणूनही त्याची ओळख आहे. अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) सिद्धार्थची तिसरी पत्नी आहे. विद्याच्या आधी सिद्धार्थने त्याची बालपणीची मैत्रीण आरती बजाजशी लग्न केले. मात्र, हे लग्न फार काळ टिकले नाही आणि दोघांनीही एकमेकांना घटस्फोट दिला. आरती बजाज नंतर सिद्धार्थने टीव्ही निर्माती कविताशी लग्न केले. तथापि, हे लग्न देखील यशस्वी झाले नाही आणि 2011 मध्ये कविता आणि सिद्धार्थ घटस्फोट घेऊन विभक्त झाले.

करण जोहरमुळे वाढली दोघांमध्ये जवळीक!

सिद्धार्थ त्याच्या दोन्ही घटस्फोटाच्या दुःखातून सावरतच होता की, त्यची भेट विद्या बालनशी झाली. फिल्मफेअरच्या एका पुरस्कार सोहळ्यात सिद्धार्थने विद्या बालनला पहिल्यांदा त्याच्या समोर बॅकस्टेजवर पाहिले. इथे दोघांचे संभाषण फक्त हाय आणि हॅलो पर्यंत मर्यादित होते. विद्या कॅमेऱ्यासमोर आणि सिद्धार्थ कॅमेऱ्याच्या मागे काम करत घोटे, पण तरीही दोघेही एकमेकांशी खूप जोडलेले वाटत होते.

या भेटीनंतर विद्या आणि सिद्धार्थला जवळ आणणारी पहिली व्यक्ती म्हणजे निर्माता-दिग्दर्शक करण जोहर. करण जोहर (Karan Johar) दोघांचा कॉमन फ्रेंड होता. यामुळे, तो त्या दोघांना खूप चांगल्या प्रकारे ओळखत होता. ऑनलाईन मीडिया रिपोर्टनुसार, करणने विद्या आणि सिद्धार्थच्या दरम्यान प्रेम फुलताना पाहिले आणि त्यानंतर त्यानेच दोघांची पहिली डेट आयोजित केली. त्या पहिल्या भेटीत विद्या आणि सिद्धार्थ एकमेकांचे चांगले मित्र झाले आणि मग त्यांची रोमँटिक प्रेमकथा सुरु झाली. दोघांनीही आपलं नातं बराच काळ लपवून ठेवलं होतं, पण त्यांच्या नात्याची बातमी मीडिया आणि बॉलिवूड कॉरिडॉरमध्ये पसरली होती.

अखेर मौन सोडले!

दोघेही बऱ्याचदा अनेक ठिकाणी एकत्र दिसले. जेव्हा त्यांच्या नात्याच्या बातम्या चर्चेत यायला लागल्या, तेव्हा मे 2012मध्ये विद्याने तिच्या आणि सिद्धार्थच्या नात्यावरील तिचे मौन सोडले आणि सांगितले की, ती सिद्धार्थला डेट करत आहे. त्याच्या सात महिन्यांनंतर म्हणजेच डिसेंबर 2012मध्ये सिद्धार्थ आणि विद्या यांचे लग्न झाले. एका मुलाखतीत विद्याने सांगितले होते की, तिला प्रथम सिद्धार्थने प्रपोज केले होते. सिद्धार्थने तिला प्रपोज केले, तेव्हा तिला सुरुवातीला विश्वास बसत नव्हता. एवढेच नाही, तर सिद्धार्थ इतका उत्साहित झाला होता की, तो प्रपोज केल्यानंतर विद्या बालन उत्तर देण्याची वाट देखील पाहू शकत नव्हता. आता सिद्धार्थ आणि विद्या यांच्या लग्नाला 8 वर्षे झाली आहेत आणि दोघेही एकत्र खूप आनंदी आहेत.

(Cute Love story of Bollywood actress Vidya Balan And producer Siddharth Roy Kapur)

हेही वाचा :

‘प्रोफेसर’ला भेटण्यासाठी प्रेक्षक उत्सुक, काही वेळातच रिलीज होणार बहुप्रतीक्षित ‘मनी हाईस्ट 5’चा ट्रेलर!

 कोट्यवधींच्या मालमत्तेची मालकीण आहे तापसी पन्नू, मुंबईत आहे आलिशान घर

'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.