Alia Bhatt | आलिया भट्टच्या चित्रपटासाठी नेटफ्लिक्सने केले खास ट्विट, नेटकरी म्हणाले की…
आलिया म्हणाली होती की, हा चित्रपट तिच्यासाठी खूप खास आहे. निर्माता म्हणून हा माझा पहिला चित्रपट आहे, तोही रेड चिलीजसोबत. हा चित्रपट ज्या प्रकारे बनवला गेला आहे, त्याबद्दल मला खूप अभिमान आहे आणि आनंदही आहे.
मुंबई : आलिया भट्टचा (Alia Bhatt) बहुप्रतिक्षित चित्रपट ‘डार्लिंग्स’ नेटफ्लिक्सवर 5 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे. हा एक डार्क कॉमेडी चित्रपट आहे. ज्यामध्ये आलिया भट्टने आतापर्यंतची सर्वात वेगळी भूमिका साकारली आहे. हा चित्रपट (Movie) प्रदर्शित होताच, OTT प्लॅटफॉर्म Netflix ने आलियाच्या चित्रपटाबद्दल एक खास पोस्ट सोशल मिडियावर (Social media) शेअर केलीयं, जी आता प्रचंड व्हायरल होताना दिसते आहे. या पोस्टवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. आलिया भट्टचा हा चित्रपट चित्रपटगृहांऐवजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला.
इथे पाहा नेटफ्लिक्सने शेअर केलेली पोस्ट
If you find us talkings likes this all days, it’s because we’ve just watched Darlings. Now streamings ❤️?
हे सुद्धा वाचा— Netflix India (@NetflixIndia) August 5, 2022
नेटफ्लिक्सने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले की…
आलिया भट्टच्या या चित्रपटाचा ट्रेलरही खूप जास्त व्हायरल झाला होता. आलियाच्या या शैलीने आणि अधिक बोलून आता नेटफ्लिक्सने अशी पोस्ट केली आहे. ट्विटरवर आलिया भट्टच्या ‘डार्लिंग्स’ या चित्रपटाचे प्रमोशन करताना नेटफ्लिक्सने पोस्ट केले – ‘जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही असे बोलत आहोत, कारण आम्ही नुकतेच डॉर्लिंग्ज पाहिल्या आहे.
आलिया अनेकवेळा या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसली
नेटफ्लिक्सच्या या पोस्टवर चाहते सतत कमेंट करत आहेत. सरफराज नावाच्या युजरने कमेंट केली – ‘आम्ही डार्लिंग्स डिअर नेटफ्लिक्स पाहिला आहे.’ त्याचवेळी दुसर्या यूजरने लिहिले – ‘नेटफ्लिक्सचा एक चांगला चित्रपट आहे.’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी आलिया अनेकवेळा या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसली होती. या चित्रपटात आलिया भट्टसोबत शेफाली शाह, विजय वर्मा आणि रोशन मॅथ्यू देखील आहेत.
आलिया भट्टसोबत शेफाली शाह, विजय वर्मा आणि रोशन मॅथ्यू
आलिया म्हणाली होती की, हा चित्रपट तिच्यासाठी खूप खास आहे. निर्माता म्हणून हा माझा पहिला चित्रपट आहे, तोही रेड चिलीजसोबत. हा चित्रपट ज्या प्रकारे बनवला गेला आहे, त्याबद्दल मला खूप अभिमान आहे आणि आनंदही आहे. चित्रपट निर्माते करण जोहरने देखील डार्लिंग्स चित्रपटाविषयी पोस्ट शेअर केली होती.