Death Anniversary | किशोर कुमार यांना आधीच आला होता मृत्यूचा अंदाज, गंमतीत बोलले अन् खरी झाली घटना!

किशोर कुमार (Kishore Kumar) बॉलिवूडमधले अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे अभिनयावर जितके प्रभुत्व होते, तितकेच चांगल्या आवाजावरही होते. बॉलिवूडमध्ये खूप कमी सेलिब्रिटी असतील, ज्यांनी प्रत्येक क्षेत्रात प्रभुत्व मिळवले असेल. किशोर कुमार हे केवळ एक उत्तम अभिनेतेच नव्हते, तर एक उत्तम गायक देखील होते.

Death Anniversary | किशोर कुमार यांना आधीच आला होता मृत्यूचा अंदाज, गंमतीत बोलले अन् खरी झाली घटना!
Kishore Kumar
Follow us
| Updated on: Oct 13, 2021 | 8:49 AM

मुंबई : किशोर कुमार (Kishore Kumar) बॉलिवूडमधले अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे अभिनयावर जितके प्रभुत्व होते, तितकेच चांगल्या आवाजावरही होते. बॉलिवूडमध्ये खूप कमी सेलिब्रिटी असतील, ज्यांनी प्रत्येक क्षेत्रात प्रभुत्व मिळवले असेल. किशोर कुमार हे केवळ एक उत्तम अभिनेतेच नव्हते, तर एक उत्तम गायक देखील होते. याशिवाय किशोर कुमारने निर्माता-दिग्दर्शक, गीतकार, पटकथा लेखक म्हणूनही भूमिका साकारल्या. किशोर कुमार यांचा जन्म 4 ऑगस्ट 1929 रोजी मध्य प्रदेशातील खंडवा येथे झाला. बॉलिवूडमध्ये अनेक गायक आले आणि गेले पण किशोर कुमार यांच्या आवाजाची जादू आजही कायम आहे.

किशोर कुमार यांचे खरे नाव आभास कुमार गांगुली होते. श्रीमंत कुटुंबात जन्मलेल्या किशोर कुमार यांचे लहानपणापासून एकच स्वप्न होते. किशोरला त्यांचे मोठे भाऊ अशोक कुमार यांच्यापेक्षा जास्त पैसे कमवायचे होते. केएल सहगल हे त्यांचे आवडते गायक होते. किशोरला नेहमीच त्यांच्यासारखे व्हायचे होते. किशोर अशोक कुमार, सती देवी, अनूप कुमार या चार भावंडांमध्ये सर्वात लहान होते. 13 ऑक्टोबर 1987 रोजी त्यांचे निधन झाले.

मुंबईत राहण्याचा कंटाळा!

मुंबईत राहूनही, किशोर कुमार यांचे मन नेहमी त्यांच्या जन्मस्थानी, खंडवामध्येच अडकले होते. एका मुलाखतीत ते म्हणाले होते की, कोणाला या शहरात राहायचे आहे, इथे प्रत्येकाला दुसऱ्याचा वापर करायचा आहे. सोबती नाही. कोणावर विश्वास ठेवू शकत नाही. मी यापासून दूर जाईन. माझ्या खंडवा शहरात. या कुरूप शहरात कोण राहील? ‘

किशोर कुमार 70 आणि 80च्या दशकातील सर्वात महागडे गायक होते. त्यांनी त्या काळातील सर्व मोठ्या कलाकारांना आपला आवाज दिला. त्यांचा आवाज विशेषतः राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांना खूप आवडला. राजेश खन्ना यांना सुपरस्टार करण्यात किशोर यांचे मोठे योगदान मानले जाते.

4 वेळा विवाह बंधनात अडकले

किशोर कुमार यांचे चार विवाह झाले. किशोर कुमार यांची पहिली पत्नी रुमा गुहा ठाकूरता होती. पण लग्नाच्या 8 वर्षानंतर त्यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला. यानंतर त्यांनी 1960 मध्ये मधुबालाशी लग्न केले. मात्र, गंभीर आजारी पडल्यानंतर वयाच्या 35व्या वर्षी मधुबालाचा मृत्यू झाला. मधुबालाच्या मृत्यूनंतर, योगिता बाली किशोर कुमारच्या आयुष्यात आली आणि दोघांनी लग्न केले, पण अवघ्या दोन वर्षांनी त्यांचे योगिताशी असलेले नातेही तुटले. यानंतर 1980मध्ये किशोर कुमार यांनी लीनाशी लग्न केले, ज्या त्यांच्यापेक्षा 20 वर्षांनी लहान होत्या.

गंमतीत बोलले अन् खरी झाली घटना!

असे म्हटले जाते की, मृत्यूपूर्वीच त्यांना समजले होते की, लवकरच ते या जगाला निरोप देणार आहेत. किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमारने एका मुलाखतीत सांगितले होते, ‘त्या दिवशी त्याने सुमितला (अमितचा सावत्र भाऊ) पोहायला जाण्यापासून रोखले आणि कॅनडाहून माझी फ्लाईट योग्य वेळी येईल ना, यावरून ते खूप चिंतित होते. त्यांना आधीच काही हृदयविकाराची लक्षणे दिसत होती, पण एक दिवस त्यांनी विनोद केला की, जर आपण डॉक्टरांना बोलावले तर त्यांना खरोखरच हृदयविकाराचा झटका येईल आणि दुसऱ्याच क्षणी त्यांना खरोखरच अटॅक आला. त्यांच्या मृत्यूनंतर किशोर कुमार यांचे अंतिम संस्कार खंडवामध्येच झाले.

हेही वाचा :

Kajol : दुर्गा पूजेदरम्यान काजोल झाली भावूक; काकांना मिठी मारत अश्रू अनावर, पाहा फोटो

‘डोई धरीला धरीला आईचा देव्हारा, भाळी लाविला लाविला देवीचा भंडारा’, ‘सोयरीक’ चित्रपटातील गोंधळाला अजयचा स्वरसाज!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.