दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहने मुंबईमध्ये खरेदी केले आलिशान घर
काही दिवसांपूर्वी बातम्या आल्या होत्या की, रणवीर आणि दीपिका हे लवकरच घटस्फोट घेणार आहेत.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह त्याच्या आगामी सर्कस या चित्रपटामुळे चर्चेत आहे. मात्र, यादरम्यानच रणवीर आणि दीपिका पादुकोण यांनी मुंबईमध्ये मोठी खरेदी केलीये. काही दिवसांपूर्वी बातम्या आल्या होत्या की, रणवीर आणि दीपिका हे लवकरच घटस्फोट घेणार आहेत. यांच्या नात्यामध्ये काहीतरी बिनसले आहे. या सर्व चर्चा सुरू असतानाच रणवीर याने दीपिकाने शेअर केलेल्या एका फोटोवर माय क्वीन अशी कमेंट केली होती. त्यानंतर घटस्फोटाच्या चर्चा फक्त अफवा असल्याचे कळाले.
रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणने मुंबईत स्वतःचा नवीन फ्लॅट घेतला आहे. विशेष म्हणजे या फ्लॅटची किंमत ऐकून तुमचे डोळे नक्कीच विस्फारतील. हा एक आलिशान फ्लॅट असून त्याची किंमतही तगडी आहे.
शाहरूख खानच्या मन्नत बंगल्याजवळ रणवीर आणि दीपिकाने हा फ्लॅट खरेदी केला आहे. ज्या इमारतीमध्ये रणवीर आणि दीपिकाने फ्लॅट बुक केला आहे, त्याचे काम अजून सुरू आहे.
View this post on Instagram
या इमारतीच्या बाहेर एक मोठा टीव्ही लावण्यात आलाय. यामध्ये फ्लॅट कसा असणार आहे, हे दाखवण्यात येतंय. यावरून हे स्पष्टच आहे की, रणवीर आणि दीपिकाचा हा फ्लॅट आलिशान असणार आहे.
रणवीर आणि दीपिकाच्या या फ्लॅटची किंमत तब्बल 119 कोटी रूपये असल्याचे सांगितले जात आहे. मुंबईतील सागर रेशम’मध्ये सी-फेसिंग अपार्टमेंट खरेदी केल्याची बातमी आहे. या अपार्टमेंटमध्ये पार्किंगची सुविधा देखील आहे.
रणवीर सिंहचा सर्कस हा चित्रपट लवकरच चाहत्यांचा भेटीला येतोय. या चित्रपटात रणवीर सिंह मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचा निर्माता रोहित शेट्टी आहे. हा एक काॅमेडी चित्रपट आहे.