Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रणवीर सिंहच्या Ask Me Anything मध्ये दीपिकाचा भन्नाट प्रश्न? रणवीरच्या उत्तरावर नेटकऱ्यांनी घेतली फिरकी

अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) अनेकदा त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे त्याच्या चाहत्यांशी संपर्कात राहण्याचा प्रपयत्न करत असतो. रणवीर सिंहने यावेळी इन्स्टाग्रामद्वारे 'आस्क मी एनिथिंग' सत्राद्वारे आपल्या चाहत्यांशी संवाद साधला.

रणवीर सिंहच्या Ask Me Anything मध्ये दीपिकाचा भन्नाट प्रश्न? रणवीरच्या उत्तरावर नेटकऱ्यांनी घेतली फिरकी
रणवीर दीपिका
Follow us
| Updated on: Sep 19, 2021 | 2:22 PM

अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) अनेकदा त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे त्याच्या चाहत्यांशी संपर्कात राहण्याचा प्रपयत्न करत असतो. रणवीर सिंहने यावेळी इन्स्टाग्रामद्वारे ‘आस्क मी एनिथिंग’ सत्राद्वारे आपल्या चाहत्यांशी संवाद साधला. रणवीर सिंगचे चाहते आणि अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी या सत्रादरम्यान रणवीरला अनेक मनोरंजक प्रश्न विचारले. मात्र, रणवीर सिंगची पत्नी आणि अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या प्रश्नाने सर्वाधिक लक्ष वेधून घेतले. दीपिकाच्या प्रश्नावर रणवीर सिंह क्लीन बोल्ड झाल्याचं दिसून आलं.

दीपिका पादुकोणनं काय विचारलं?

अभिनेत्री दीपिका पादुकोणने रणवीरला विचारलेला प्रश्न वाचून चाहते रणवीरची खूप खेचत आहेत. रणवीरनं देखील दीपिकाच्या प्रश्नाला उत्तर दिलं आहे. वास्तविक, दीपिका पादुकोणला रणवीरला घरी कधी येणार हे विचारलं. दीपिकाने लिहिले- तू घरी कधी येत आहेस? रणवीरनेही दीपिकाच्या या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले नाही, त्यानेही तिला उत्तर दिलं.

दीपिकाच्या प्रश्नाला रणवीरचं उत्तर

ranveer singh post

रणवीर सिंहची पोस्ट

दीपिकानं घरी कधी येतोय हे विचारल्यानंतर रणवीरनं देखील तिला उत्तर दिलं आहे. “खाना गरम करलो बेबी, मै अभी बस पहुंच ही रहा हूं” असं उत्तर रणवीर सिंहंनं दीपिकाला दिलं आहे. रणवीर सिंहने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर दीपिकाच्या प्रश्नासह त्याच्या उत्तराचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. तो स्क्रीन शॉट आता चांगलाच व्हायरल होत आहे. रणवीर सिंहचे काही चाहतेही त्याला एक बायकोला घाबरणारा नवरा म्हणत त्याची खेचत आहेत. मात्र, दोघांचा वैयक्तिक प्रश्न असून नेटकऱ्यांनी यावर जादा लक्ष देऊ नये, असंही काही जणांनी म्हटलं आहे.

दीपिका आणि रणवीरची जोडी त्यांच्या चाहत्यांना खूप आवडते. मग ते दोघे ऑन कॅमेरा असो किंवा ऑफ कॅमेरा दोघांचे चाहते दोघांच्या गोष्टींना पसंत करत असतात. जेव्हा जेव्हा रणवीर आणि दीपिका त्यांचे फोटो आणि व्हिडिओ एकमेकांसोबत शेअर करतात, तेव्हा त्यांचे चाहते त्या पोस्ट्सवर लाईक आणि कमेंट करतात.

दीपिका आणि रणवीरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर दीपिका पती रणवीरसह कबीर खानच्या 83 मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात रणवीर कपिल देव आणि दीपिका त्याची पत्नी रोमी देव यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. याशिवाय दीपिकाकडे शकुन बत्राचा आगामी चित्रपटही आहे. याशिवाय ती फायटरमध्येही दिसणार आहे. दीपिका चित्रपट पठाण, नाग अश्विनचा आगामी चित्रपट आणि द इंटर्न चित्रपटातही दिसणार आहे.

इतर बातम्या:

Television Celebrities : कपिल शर्मापासून दिव्यांका त्रिपाठीपर्यंत हे 7 सेलेब्स एका एपिसोडमधून करतात लाखोंची कमाई

Bigg Boss Marathi 3 : बिग बॉस मराठी 3 पर्वाची सुरुवात ग्रँड प्रीमिअरनं होणार, कुठे आणि किती वाजता पाहायचे एपिसोड

Deepika padukone asks to ranveer singh when are you coming home he gives hilarious reply

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.