Deepika Padukone | दीपिका पादुकोण हिने दिला सुखी वैवाहिक आयुष्याचा मंत्र , म्हणाली, मी आणि रणवीर
बाॅलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. दीपिका पादुकोण हिचा पठाण हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच रिलीज झालाय. विशेष म्हणजे पठाण चित्रपट बाॅक्स आॅफिसवर जबरदस्त कमाई करताना दिसला. मात्र, चित्रपट रिलीज झाल्यानंतर मोठा वाद सुरू होता.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) ही कायमच चर्चेत असते. दीपिका पादुकोण ही पठाण चित्रपटामध्ये धमाल करताना दिसली. विशेष म्हणजे पठाण चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर धमाल केली आणि हा चित्रपट (Movie) सर्वाधिक कमाई करणारा ठरला. पठाण (Pathaan) चित्रपटातील बेशर्म रंग या गाण्यामुळे मोठ्या वादाला तोंड फुटले होते. या गाण्यात दीपिका पादुकोण हिने भगव्या रंगाची बिकिनी घातल्याने अनेकांनी तिला टार्गेट केले. इतकेच नाही तर यामुळे चित्रपटावर बंदी घालण्याची मागणीही थेट अनेकांनी केली होती. पठाण हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर मोठ्या वादाला तोंड फुटले. मात्र, या वादावर त्यावेळी बोलणे दीपिका पादुकोण हिने टाळले होते.
नुकताच दीपिका पादुकोण हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये दीपिका पादुकोण ही खासगी आयुष्याबद्दल बोलताना देखील दिसली आहे. या मुलाखतीमध्ये दीपिका पादुकोण हिने चांगल्या वैवाहिक आयुष्याचा मंत्र देखील सांगितला आहे. कोणत्या गोष्टी आपण चांगल्या वैवाहिक आयुष्यासाठी फाॅलो करायला हव्यात हे सांगताना दीपिका पादुकोण ही दिसली.
दीपिका पादुकोण म्हणाली की, सर्वजण चित्रपट पाहून आणि आपल्या सभोवतालचे वातावरण पाहून मोठे होतात. आपण लहानपणापासून आपल्या अजूबाजुच्या लोकांचे वैवाहिक आयुष्य बघत असतो. मला वाटते की, कोणत्याही नात्यासाठी संयम ही खूप जास्त महत्वाची गोष्ट आहे. मात्र, नव्या पिढीमध्ये संयम अजिबात दिसत नाही किंवा त्यांच्यामध्ये संयमाचा अभाव नक्कीच आहे.
फक्त रणवीर आणि मी आमच्या पालकांकडूनच नाही तर मला वाटते की आमच्यासारख्या आणखी लग्न झालेल्यांनी आधीच्या पिढीकडून शिकायला हवे. याशिवाय अनेक बऱ्याच गोष्टी आहेत, पण संयम ही पहिली आणि महत्वाची गोष्ट आहे. काही दिवसांपूर्वीच दीपिका पादुकोण हिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये दीपिका पादुकोण ही विमानामध्ये चेहरा लपवून प्रवास करताना दिसली.
दीपिका पादुकोण हिचा पती अर्थात रणवीर सिंह हा देखील काही दिवसांपासून चर्चेत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रणवीर सिंह याचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करू शकत नाहीयेत. एका मागून एक असे रणवीर सिंह याचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप जाताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी रणवीर सिंह याचा सर्कस हा चित्रपट रिलीज झाला होता. मात्र, या चित्रपटाला धमाका करण्यात यश मिळाले नाहीये. रोहित शेट्टी याचा सर्कस हा चित्रपट होता.