Deepika Padukone | पठाण चित्रपट अनेक रेकाॅर्ड तोडत असताना दीपिका पादुकोण हिचे मोठे विधान, म्हणाली…

| Updated on: Jan 30, 2023 | 9:51 PM

काही थिएटर मालकांना नोटीसा देखील पाठवण्यात आल्या होत्या. चित्रपटाची रिलीज डेट जशी जवळ येत होती तसा चित्रपटाच्या विरोधातील संताप वाढत होता.

Deepika Padukone | पठाण चित्रपट अनेक रेकाॅर्ड तोडत असताना दीपिका पादुकोण हिचे मोठे विधान, म्हणाली...
Pathaan
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई : एकीकडे पठाण चित्रपटाचा बाॅक्स आॅफिसवर धमाका सुरू आहे आणि दुसरीकडे शाहरुख खान याने अनेक प्रश्नांची आज उत्तरे दिली आहेत. शाहरुख खान याच्यासह दीपिका पादुकोण (Deepika Padukone) हिने देखील पठाण चित्रपटासंदर्भात काही महत्वाची माहिती शेअर केली. पठाण (Pathaan) हा चित्रपट २५ जानेवारी रोजी रिलीज झालाय. मात्र, चित्रपटातील बेशर्म रंग हे गाणे रिलीज झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. अनेकांनी चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची थेट मागणी करून टाकली होती. इतकेच नाहीतर मुंबईमध्ये बजरंग दल आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. काही थिएटर मालकांना नोटीसा देखील पाठवण्यात आल्या होत्या. चित्रपटाची रिलीज डेट जशी जवळ येत होती तसा चित्रपटाच्या विरोधातील संताप वाढत होता. मात्र, प्रत्यक्षात जेंव्हा चित्रपट रिलीज झाला. तेंव्हा एक वेगळेच वातावरण बघायला मिळाले. सुरूवातीपासूनच पठाण चित्रपटा विषयी शाहरुख खान याच्या चाहत्यांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळत होता. चित्रपट रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर ताबडतोब कमाई केली.

शाहरुख खान याच्या चित्रपटासाठी चाहते कित्येक तास लाईनमध्ये उभे राहत चित्रपटाचे तिकिटे खरेदी करत होते. चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदरच चित्रपटाचे तिकिटेही बुक होती. ओपिनिंग डेला चित्रपटाची तिकिटे देखील मिळत नव्हती.

२५ जानेवारीला बाॅक्स आॅफिसवर फक्त आणि फक्त पठाण चित्रपटाचीच हवा बघायला मिळाली. बाॅलिवूडच्या अनेक कलाकारांनी आणि चित्रपट निर्मात्यांनी पठाण चित्रपटासाठी शाहरुख खान याचे काैतुक केले.

विशेष म्हणजे शाहरुख खान याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले. झिरो चित्रपट फ्लाॅप गेल्यानंतर शाहरुख खान बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर होता.

पठाण या चित्रपटामध्ये शाहरुख खान याच्यासोबत अभिनेत्री दीपिका पादुकोण देखील मुख्य भूमिकेत होती. नुकताच दीपिका पादुकोण हिने चित्रपटाच्या बाॅक्स आॅफिस कलेक्शनबद्दल मोठे विधान केले आहे.

दीपिका पादुकोण म्हणाली की, आम्ही रेकाॅर्ड तोडण्यासाठी चित्रपट बनवत नव्हतो… आम्ही लोकांचे मनोरंजन करण्यासाठी आणि चांगल्या लोकांसोबत वेळ घालवण्यासाठी चित्रपट बनवत होतो.

पठाण चित्रपटासाठी सर्वांनीच खूप जास्त मेहनत घेतलीये. मग तो सेटवरील कोणताही व्यक्ती असो…दीपिकाने चाहत्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आभार मानले आहेत…दीपिका म्हणाली की, हा चित्रपट लोकांच्या जीवनात आनंद आणण्यासाठी बनवण्यात आला होता…