Satish Kaushik | सतीश कौशिक मृत्यू प्रकरण विकास मालूच्या पत्नीचा जबाब दिल्ली पोलिस नोंदवणार, सान्वी हिने केला मोठा दावा
सतीश कौशिक यांच्या निधनानंतर विकास मालू यांची पत्नी सान्वी मालू हिने काही धक्कादायक दावे केले आहेत. यामुळे सतीश कौशिक यांचे निधन नेमके कशाने झाले हा प्रश्न उपस्थित झाला.
मुंबई : बॉलिवूड अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते सतीश कौशिक (Satish Kaushik) यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. सतीश कौशिक यांचे निधन 9 मार्च रोजी झाले. दिल्लीमध्ये विकास मालू यांच्याकडे होळीच्या पार्टीसाठी ते गेले होते. यादरम्यान त्यांची तब्येत खराब झाली आणि त्यांचे निधन झाले. सतीश कौशिक यांच्या निधनानंतर बाॅलिवूड विश्वावर शोककळा पसरली. अनुपम खेर (Anupam Kher) यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सतीश कौशिक यांच्या निधनाची बातमी सांगितली. सतीश कौशिक यांचे निधन झाल्याचे कळताच चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला होता. सतीश कौशिक यांचे पार्थिव दिल्लीहून मुंबईमध्ये आणले गेले.
सतीश कौशिक यांच्या निधनानंतर विकास मालूच्या पत्नीने काही धक्कादायक दावे केले. यामुळे सतीश कौशिक यांचे निधन नेमके कशाने झाले हा प्रश्न उपस्थित झाला. विकास मालूची पत्नी सान्वी मालू हिने पती विकास मालू यानेच सतीश कौशिक यांना मारले असल्याचे म्हटले आणि त्याचे कारणही तिने थेट सांगून टाकले.
15 कोटी सतीश कौशिक यांनी विकास मालूला दिले होते. मात्र, सतीश कौशिक यांनी विकास मालू याला 15 कोटी रूपये परत मागितल्यानेच विकास मालूने सतीश कौशिक यांना मारले असावे, असे सान्वी मालू हिने म्हटले होते. सान्वी मालू हिच्या या दाव्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. मात्र, त्यानंतर सतीश कौशिक यांच्या पत्नी शशी कौशिक यांनी या वादामध्ये माझ्या पतीला ओढू नका असे खडसावून सांगितले.
आता सान्वी मालू हिचा जबाब आज दिल्ली पोलिसांकडून नोंदवला जाणार आहे. आता या चाैकशीमधून नेमके काय बाहेर येते, हे बघण्यासारखे ठरणार आहे. शशी कौशिक यांनी तर सान्वी मालू हिला विकास मालू यांच्याकडून पैसे काढायचे असल्याचे ती अशाप्रकारचे आरोप करत असल्याचे म्हटले होते. आता यावरच दिल्ली पोलिसांकडून जबाब नोंदवला जाणार आहे. आहे.
विकास मालू यांच्या फार्म हाऊसवर पोलिसांनी झडती घेतली असताना काही आक्षेपार्ह औषधे फार्महाऊसवर सापडली. यामुळे शंका उपस्थित केली जात होती. सान्वी मालू हिने काही धक्कादायक खुलासे केले आहेत. सान्वी मालू हिने सतीश कौशिक यांच्या निधनानंतर दिल्ली पोलिस आयुक्तांना एक मेल पाठवला होता. सतीश कौशिक यांच्या निधनानंतर सलमान खान याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती.