Dhanush: धनुष-ऐश्वर्याकडून चाहत्यांना मिळणार ‘गुडन्यूज’?

धनुषच्या वैवाहिक आयुष्याबद्दल सकारात्मक अपडेट

Dhanush: धनुष-ऐश्वर्याकडून चाहत्यांना मिळणार 'गुडन्यूज'?
Dhanush and Aishwarya RajinikanthImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 06, 2022 | 2:04 PM

मुंबई- दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार धनुष (Dhanush) आणि त्याची पत्नी ऐश्वर्या रजनीकांत (Aishwaryaa Rajinikanth) यांनी जवळपास नऊ महिन्यांपूर्वी घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं होतं. 18 वर्षांच्या संसारानंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर कुटुंबीयांनी दोघांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र या दोघांचं पुन्हा पॅचअप झालं की नाही, याबाबत अधिकृत माहिती नव्हती. आता दोघांनीही घटस्फोट (Divorce) न घेण्याचा निर्णय घेतल्याचं कळतंय.

ऐश्वर्या ही सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी आहे. धनुषने 2004 मध्ये ऐश्वर्याशी लग्नगाठ बांधली होती. या दोघांना यात्रा आणि लिंगा अशी दोन मुलं आहेत. आता धनुष आणि ऐश्वर्या यांनी घटस्फोटाचा निर्णय मागे घेत असल्याची चर्चा असली तरी या दोघांनी अद्याप त्यावर भाष्य केलं नाही.

या वर्षाच्या सुरुवातीला दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित विभक्त होण्याचा निर्णय जाहीर केला होता. आमच्या खासगी आयुष्याचा आदर करत थोडा वेळ द्या, अशी विनंती त्यांनी चाहत्यांना केली होती.

हे सुद्धा वाचा

’18 वर्षांची सोबत, मैत्री, पती-पत्नी, आई-वडील आणि एकमेकांचे शुभचिंतक बनून आम्ही एकत्र सहजीवनाचा प्रवास केला. आज आम्ही अशा टप्प्यावर आहोत, जिथून आमचे मार्ग वेगळे होणार आहेत. ऐश्वर्या आणि मी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. कृपया आमच्या या निर्णयाचा आदर करा आणि आम्हाला थोडा वेळ द्या’, अशी पोस्ट धनुषने लिहिली होती.

या दोघांनी घटस्फोटाचा निर्णय जाहीर केल्यानंतर धनुषच्या वडिलांनी त्यावर प्रतिक्रिया दिली होती. “त्या दोघांमध्ये भांडण झाल्यं. हे भांडण कौटुंबिक आहे. पण मी त्यांच्याशी बोलून दोघांनाही समजावलंय”, असं ते म्हणाले होते.

धनुष हा प्रसिद्ध निर्माते कस्तुरी राजा यांचा मुलगा आहे. तो अभिनेत्यासोबतच निर्माता, डान्सर, पार्श्वगायक, गीतकार आणि संवादलेखकही आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.