धर्मेंद्रंना सोशल मीडियावर मागावी लागली चाहत्यांची माफी! जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र देओल (Dharmendra) यांची सोशल मीडियावर चांगली फॅन फॉलोइंग आहे. अभिनेते अनेकदा चाहत्यांच्या मनोरंजनासाठी सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. धर्मेंद्र यांनी नुकताच त्यांचा धाकटा मुलगा बॉबीचा थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे.

धर्मेंद्रंना सोशल मीडियावर मागावी लागली चाहत्यांची माफी! जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?
Dharmendra
Follow us
| Updated on: Dec 23, 2021 | 11:32 AM

मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र देओल (Dharmendra) यांची सोशल मीडियावर चांगली फॅन फॉलोइंग आहे. अभिनेते अनेकदा चाहत्यांच्या मनोरंजनासाठी सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. धर्मेंद्र यांनी नुकताच त्यांचा धाकटा मुलगा बॉबीचा थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत अभिनेत्याने कॅप्शन लिहिले की, ‘तो स्वतःची चांगली काळजी घेत नाही’. अभिनेत्याची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मंगळवारी धर्मेंद्र यांनी बॉबीचा एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये तो हसताना दिसत आहे. त्याच्या एका चाहत्याला उत्तर देताना धर्मेंद्र म्हणाले की, कधी कधी माझ्या सुंदर बॉबीला समजून घेण्यासाठी मी अशी छायाचित्रे शेअर करतो जेणेकरून तो स्वतःची काळजी घेईल. त्यांनी पुढे लिहिले की, ‘मित्रांनो, अशी मुले मिळाली, मी स्वतःला भाग्यवान समजतो’.

पाहा पोस्ट :

मंगळवारी धर्मेंद्र यांनी त्यांच्या अनेक चाहत्यांचे आभार मानले ज्यांनी त्यांच्या चित्रपटांची जुनी गाणी, व्हिडीओ क्लिप शेअर केल्या. काही लोकांनी त्याला सनीसोबतच्या काही फोटोंमध्ये त्यांना टॅग केले आहे. धर्मेंद्र यांनी चाहत्यांचे आभार मानले, ज्यांनी त्याच्या कुटुंबाला इतके प्रेम दिले. दरम्यान, अभिनेत्याने त्यांच्या चाहत्यांची माफीही मागितली आहे. त्यांनी ट्विट केले आणि लिहिले की, ‘आज कळत नाहीये मी इतके ट्विट का केले? तुम्हाला कंटाळा आला असल्यास मला माफ करा.’

‘रॉकी और रानी की लव्हस्टोरी’मध्ये दिसणार धर्मेंद्र!

धर्मेंद्र करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की लव्हस्टोरी’ या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात आलिया आणि रणवीर सिंह मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय जया बच्चन आणि शबाना आझमी यांच्याही भूमिका आहेत. नुकतेच क्रूने दिल्लीतील शूट पूर्ण केले. धर्मेंद्र सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात, ते अनेकदा त्यांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात.

सनी देओल ‘गदर 2’च्या शूटिंगमध्ये व्यस्त!

धर्मेंद्रप्रमाणेच सनी आणि बॉबीही वडिलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. या तिघांना एकत्र पाहणे चाहत्यांसाठी आश्चर्यापेक्षा कमी नाही. बॉबी देओल बराच काळ चित्रपट जगतापासून दूर होता. सलमान खानने ‘रेस 3’ मधून त्याच्या करिअरला संधी दिली. सध्या त्याच्याकडे अनेक मोठे प्रकल्प आहेत. सध्या सनी देओल त्याचा आगामी चित्रपट ‘गदर 2’ चे शूटिंग करत आहे. पिता-पुत्राची जोडी एकत्र येण्याची अनेक दिवसांपासून चाहते वाट पाहत आहेत. चित्रपटांसोबतच अभिनेता राजकारणातही सक्रिय आहे.

हेही वाचा :

Happy Birthday Ravi Dubey | मालिकेच्या सेटवर भेट झाली अन् अभिनेत्रीच्या प्रेमातच पडला! वाचा रवी दुबेची लव्हस्टोरी…

Ganapath | अरे देवा! टायगरच्या डोळ्याला काय झालं? ‘गणपत’च्या चित्रिकरणादरम्यान टायगर श्रॉफ जखमी!

चाहत्याच्या लग्नात चक्क सेलिब्रिटींची एण्ट्री, ‘ओम आणि स्वीटू’ जोडीने विवाह सोहळ्याचा आनंद दुणावला!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.