Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dilip Kumar Death | मोहम्मद युसुफ खान कसे बनले दिलीप कुमार? जाणून घ्या ‘या’ नावामागची कहाणी..

बॉलिवूडचा अभिनय सम्राट आणि ‘ट्रॅजेडी किंग’ दिलीप कुमार (Dilip Kumar) यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. नुकतेच 30 जून रोजी त्यांना मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. दिलीप कुमार यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीच्या एका शतकाचा अस्त झाला आहे.

Dilip Kumar Death | मोहम्मद युसुफ खान कसे बनले दिलीप कुमार? जाणून घ्या ‘या’ नावामागची कहाणी..
दिलीप कुमार
Follow us
| Updated on: Jul 07, 2021 | 10:30 AM

मुंबई : बॉलिवूडचा अभिनय सम्राट आणि ‘ट्रॅजेडी किंग’ दिलीप कुमार (Dilip Kumar) यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. नुकतेच 30 जून रोजी त्यांना मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. दिलीप कुमार यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीच्या एका शतकाचा अस्त झाला आहे. त्यांच्या जाण्याने संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. साश्रू डोळ्यांनी लोक त्यांच्या दिग्गज अभिनेत्याला श्रद्धांजली वाहात आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, ‘मोहम्मद युसुफ खान’ (Mohammed Yusuf Khan) नावाचा व्यक्ती बॉलिवूडचा सर्वात सुपरहिट स्टार कसा बनला? चला तर, मोहम्मद युसुफ खान कसे बनले दिलीप कुमार जाणून घेऊया…(Dilip Kumar Death know how Mohammed Yusuf Khan becomes Dilip Kumar)

वडिलांसोबत मुंबईला प्रस्थान

जगभरात दिलीपकुमार या नावाने प्रसिद्धी मिळवलेल्या युसूफ यांना कदाचित आपण किती मोठे भवितव्य निवडले आहे, हेदेखील माहित नसेल. आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की ज्याच्या अभिनयाची उदाहरणे दिली जातात, त्यांना ना चित्रपटात काम करण्यास आवड होती ना नाव बदलण्याची. पण दिलीपकुमारचे वडील फळांचा व्यवसाय करण्यासाठी मुंबईत आले होते. अगदी अगदी सुरुवातीपासूनच दिलीपकुमार वडिलांची मदत करत असत. त्यावेळी तो युसुफ सरवर खान, व्यापारी मोहम्मद सरवर खान यांचा मुलगा असायचा.

देविका राणी यांनी दिले एक नवीन नाव

बॉम्बे टॉकीजच्या मालकीण म्हणजेच देविका राणी यांनी दिलीप कुमारला मोठ्या पडद्यावर पहिली संधी दिली. जेव्हा त्यांना चित्रपटात संधी मिळाली, तेव्हा एकदा रिलीजच्या आधी देविका राणींनी त्यांना त्यांच्या केबिनमध्ये बोलावले. दिलीपकुमार यांनी त्यांच्या ‘द सबस्टन्स अँड दी शॅडो’ या आत्मचरित्रात या भेटीविषयी लिहिले आहे. त्या आपल्या शानदार इंग्रजीत म्हणाल्या की, ‘युसुफ, मला लवकरात लवकर अभिनेता म्हणून तुझी सुरुवात ककरून द्यायची आहे. तर तुझ्यासाठी एखादे स्क्रीन नाव ठेवणे ही कल्पना तशी वाईट नाहीय. असे नाव ज्याद्वारे जग तुला ओळखेल आणि प्रेक्षक तुझी रोमँटिक प्रतिमा त्यासह संबद्ध करतील. मला वाटते की दिलीप कुमार हे एक चांगले नाव आहे. जेव्हा मी तुझ्या नावाचा विचार करत होते, तेव्हा अचानक हे नाव माझ्या मनात आले. तुला हे नाव कसे वाटते? ‘

नाव ऐकल्यानंतर बोलती झाली बंद!

आपल्या आत्मचरित्रात ही घटना पुढे सांगताना त्यांनी असे लिहिले आहे की, हे ऐकल्यानंतर त्यांची बोलतीच बंद झाली होती. कारण ते अशा प्रकारे आपली ओळख बदलण्यास अजिबात तयार नव्हते. म्हणूनच त्याने देविका राणीला विचारले की, ‘हे करणे खरोखर आवश्यक आहे काय?’ यावर देविका राणी यांनी दिलीपकुमार यांना उत्तर दिले की असे करणे हाच योग्य निर्णय असेल. आणि यानंतर ‘दिलीप कुमार’ या नावाने अवघे मनोरंजन विश्व गाजवले!

(Dilip Kumar Death know how Mohammed Yusuf Khan becomes Dilip Kumar)

हेही वाचा :

दिलीपकुमार : अभिनयाचा जादूगार, अभिनेत्रींची पसंती आणि बॉक्सऑफिसचा हुकमी एक्का

Dilipkumar Death | ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांचं निधन, बॉलिवूडवर शोककळा

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.