Dilip Kumar Health Update | दिलीप कुमार यांच्या तब्येतीत सुधारणा, रुग्णालयातून लवकरच डिस्चार्ज मिळणार
हिंदी सिनेमाचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांची प्रकृती आता सुधारत आहे. याची पुष्टी दिलीपकुमार यांचे कौटुंबिक मित्र फैजल फारुकी यांनी शुक्रवारी दिली. दिलीप कुमार यांना श्वास घेण्यात अडचण झाल्याने त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मुंबई : हिंदी सिनेमाचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांची प्रकृती आता सुधारत आहे. याची पुष्टी दिलीपकुमार यांचे कौटुंबिक मित्र फैजल फारुकी यांनी शुक्रवारी दिली. दिलीप कुमार यांना श्वास घेण्यात अडचण झाल्याने त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथे त्यांना इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये (आयसीयू) ठेवण्यात आले. सध्या दिलीप कुमार यांची प्रकृती ठीक असून येत्या एक-दोन दिवसांत त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात येईल (Dilip Kumar Health Update legendary actors health is stable now soon will get discharge).
मंगळवारी (29 जून) 98 वर्षीय दिलीप कुमार यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता आणि त्यांचे वयही अधिक आहे, ज्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. फैझलने सांगितले की, आता दिलीप कुमार ठीक आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तो रुग्णालयातच राहतील, जेणेकरुन डॉक्टर त्यांचे वय लक्षात घेऊन आवश्यक वैद्यकीय उपचार देऊ शकतील.
नुकताच मिळाला होता डिस्चार्ज
यापूर्वीही श्वास घेताना त्रास झाल्याने दिलीपकुमार यांना रुग्णालयात नेण्यात आले होते. तपासणीनंतर डॉक्टरांच्या टीमच्या लक्षात आले होते की, फुफ्फुसात काही संसर्ग झाल्यामुळे दिलीप साहेबांना श्वास घेण्यात त्रास होत आहे. ज्यानंतर त्याच्या फुफ्फुसातील पाणी काढून टाकले गेले आणि बायपास करून फुफ्फुस तंत्राने उपचार केले गेले.
यावेळी सुमारे 350 मिलीलीटर द्रव काढून टाकण्यात आला. ज्यानंतर दिलीप कुमाराला खूप अशक्तपणा जाणवत होता. या उपचारानंतर त्याच्या ऑक्सिजनची पातळी वाढू लागली. समाधान व्यक्त करत डॉक्टरांनी त्यांना 11 जूनला डिस्चार्ज दिला होता.
दिलीप कुमार यांची प्रतिकारशक्ती कमकुवत
सायरा बानो यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते की दिलीप कुमार यांची प्रकृती आता पूर्वीपेक्षा खूपच खालावली आहे. त्यांची प्रतिकारशक्तीही कमी झाली आहे, ज्यामुळे जास्त चालू शकत नाहीत. त्यांना चालताना नेहमीच आधाराची गरज भासते. (Dilip Kumar Health Update)
पतीची सेवा करणाऱ्या सायरा बानो
“दिलीप कुमार माझ्या हृदयाची धडकन आहेत. त्यांना स्पर्श करणं, त्यांच्याकडे पाहत राहणं हा माझ्यासाठी जगातील सर्वोच्च आनंद आहे. तेच माझा श्वासोच्छ्वास आहेत, मी आजन्म त्यांच्याकडे पाहत राहू शकते. मी आजही त्यांची दृष्ट काढते” असं सायरा बानो यांनी मागे एका मुलाखतीत सांगितलं होतं.
बारा दिवसात दोन भाऊ गमावले
दिलीप कुमार यांच्या दोघा धाकट्या भावांचा गेल्या वर्षी कोरोनाने मृत्यू झाला. 88 वर्षीय अस्लम खान यांचे 21 ऑगस्ट रोजी मुंबईतील लीलावती रुग्णालयात निधन झाले. तर बारा दिवसांनीच (चार सप्टेंबर) 92 वर्षांच्या एहसान खान यांची प्राणज्योत मालवली. कोरोना काळात संसर्ग टाळण्यासाठी दिलीप कुमार यांना घरीच आयसोलेट करण्यात आले आहे.
(Dilip Kumar Health Update legendary actors health is stable now soon will get discharge)
हेही वाचा :
बारा दिवसात दोन भाऊ गमावले, दिलीपकुमार यांचे धाकटे बंधू एहसान खान यांचे निधन
दिलीप कुमार आणि राज कपूर यांच्या वडिलोपार्जित घरांना पाकिस्तान सरकारकडून ऐतिहासिक इमारतीचा दर्जा