दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम यांनी खरेदी केली तब्बल इतक्या कोटींची आलिशान कार
दीपिका कक्कर हिने शोएब इब्राहिमसोबत लग्न केल्यानंतर तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले होते.
मुंबई : टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर ही गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. 2018 मध्ये दीपिका हिने टीव्ही अभिनेता शोएब इब्राहिम याच्यासोबत लग्न करत सर्वांनाच मोठा धक्का दिला होता. दीपिका कक्कर हिने शोएब इब्राहिमसोबत लग्न केल्यानंतर तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. इतकेच नाहीतर दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम यांच्या लग्नाला आता चार वर्ष होऊन गेले असताना देखील अजूनही लोक दीपिकाला ट्रोल करताना दिसतात.
दीपिका कक्कर लग्न झाल्यापासून टीव्ही मालिकांपासून दूर गेलीये. दीपिका आपल्या चाहत्यांच्या संपर्कामध्ये राहण्यासाठी लाईव्ह ब्लाॅग तयार करते. मात्र, दीपिकाला बऱ्याच वेळा ट्रोल व्हावे लागते.
View this post on Instagram
नुकताच नव्या वर्षामध्ये शोएब याने दीपिकाला एक मोठे गिफ्ट दिले आहे. शोएबने दीपिकाला BMW X7 ही लक्झरी कार गिफ्ट केलीये. आता याचे फोटो व्हायरल होताना दिसत आहे.
शोएब इब्राहिम याने सोशल मीडियावर नव्या गाडीसोबतचा एक फोटो शेअर केलेला दिसत आहे. या फोटोमध्ये दीपिका देखील दिसत आहे. आता हेच फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.
दीपिका आणि शोएब इब्राहिम यांनी खरेदी केलेल्या आलिशान कारची किंमत कोटींच्या घरात असून BMW X7 ही कार तब्बल 1 कोटी 10 लाख रुपयांची आहे. अनेकजण दीपिका आणि शोएबला BMW X7 खरेदी केल्याबद्दल शुभेच्छा देत आहेत.