अभिनेत्रीच्या पायाचा मसाज करतानाचा राम गोपाल वर्मा यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

या चित्रपटामध्ये मोठ्या प्रमाणात रोमँटिक सीन्स बघायला मिळणार आहेत.

अभिनेत्रीच्या पायाचा मसाज करतानाचा राम गोपाल वर्मा यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल
Follow us
| Updated on: Dec 07, 2022 | 3:31 PM

मुंबई : चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा एक चर्चेतील नाव आहे. खतरा डेंजरस हा त्यांचा बहुचर्चित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये मोठ्या प्रमाणात रोमँटिक सीन्स बघायला मिळणार आहेत. दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात राम गोपाल वर्मा यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत निषेध व्यक्त केला होता. इतकेच नाही तर त्यांनी पोस्टमध्ये म्हटले होते की, श्रद्धाने एक आत्मा म्हणून परत यावे आणि आफताब पुनावाला याचे 70 तुकडे करावेत. आता एका फोटोमुळे राम गोपाल वर्मा पुन्हा एकदा चर्चेमध्ये आले आहेत.

राम गोपाल वर्मा यांच्या व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये दिसत आहे की, खतरा डेंजरस चित्रपटातील अभिनेत्री आशु रेड्डी हिच्या पायाचा राम गोपाल वर्मा हे मसाज करत आहेत. हा फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतोय.

काहींनी हा फोटो पाहून आश्चर्य व्यक्त केले आहे. राम गोपाल वर्मा नेमके काय करत आहेत? असे अनेकजण विचारताना दिसत आहेत. मात्र, राम गोपाल वर्मा या फोटोच्या माध्यमातून आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करत असल्याचे दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Ashu Reddy (@ashu_uuu)

राम गोपाल वर्मा हे नेहमीच आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी काहीही करतात. याचाच हा एक भाग असून चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हे अभिनेत्री आशु रेड्डीच्या पायाचा मसाज करत आहेत.

आशु रेड्डी हिने हा फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर असून या फोटोवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. खतरा डेंजरस या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.

खतरा डेंजरस हा चित्रपट 8 एप्रिलला अगोदर रिलीज होणार होता. मात्र, त्यावेळी चित्रपट वादामध्ये अडकल्याने रिलीज होऊ शकला नव्हता. आता हा चित्रपट 9 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.