‘डिस्को डान्सर’च्या दिग्दर्शकाची आर्थिक स्थिती बिकट, पत्नीच्या उपचारासाठी लोकांकडे मागतायत मदत!

बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते बी सुभाष (B Subhash) त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण टप्प्यातून जात आहेत. त्यांनी अनेक हिट चित्रपटांची निर्मिती केली आहे, ज्यात 'डिस्को डान्सर', 'आंधी तुफान', 'अॅडव्हेंचर्स ऑफ टारझन' आणि 'कसम पैदा करने वाली की' यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

'डिस्को डान्सर'च्या दिग्दर्शकाची आर्थिक स्थिती बिकट, पत्नीच्या उपचारासाठी लोकांकडे मागतायत मदत!
B Subhash
Follow us
| Updated on: Nov 16, 2021 | 5:47 PM

मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते बी सुभाष (B Subhash) त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण टप्प्यातून जात आहेत. त्यांनी अनेक हिट चित्रपटांची निर्मिती केली आहे, ज्यात ‘डिस्को डान्सर’, ‘आंधी तुफान’, ‘अॅडव्हेंचर्स ऑफ टारझन’ आणि ‘कसम पैदा करने वाली की’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. मात्र, आता त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. त्यांची अवस्था अशी झाले आहे की, त्यांच्याकडे पत्नीवर उपचार करण्यासाठी देखील पैसे नाहीत.

आपल्या कारकिर्दीत अनेक संस्मरणीय चित्रपट देणारे हे सुप्रसिद्ध चित्रपट निर्माता गेल्या काही दिवसांपासून आर्थिक संकटातून जात आहे. या आर्थिक चणचणीमुळे दिग्दर्शकाला आपल्या आजारी पत्नीच्या उपचारासाठी ऑनलाईन पैसे गोळा करणाऱ्या वेबसाईटचा आधार घ्यावा लागत आहे.

बी सुभाष यांच्या 67 वर्षीय पत्नी तिलोत्तमा फुफ्फुसाच्या आजारामुळे जीवन आणि मृत्यूशी संघर्ष करत आहेत. त्यांच्यावर मुंबईतील अंधेरी येथील प्रसिद्ध कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बी सुभाष आणि तिलोत्तमा यांची मुलगी स्वेता यांनी क्राउडफंडिंग वेबसाईट ‘केटो’ वर पोस्ट केलेल्या फंडरेजर आवाहनानुसार, त्यांना तिलोत्तमा यांच्या उपचारासाठी सुमारे 30 लाख रुपये गोळा करावे लागणार आहेत आणि ही रक्कम गोळा करण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आपल्या आवाहनात, कुटुंबाने म्हटले आहे की, “प्रत्येकाचे योगदान महत्वाचे आहे.”

आतापर्यंत इतकी रक्कम जमा

श्वेताच्या पोस्टनंतर ही स्टोरी व्हायरल होईपर्यंत 4 जणांकडून 15 हजार 500 रुपये जमा झाले आहेत. सेलिना जेटलीसह, इंडस्ट्रीतील अनेकांनी हळूहळू ही पोस्ट शेअर करण्यास सुरुवात केली आहे. ‘द क्विंट’शी संवाद साधताना बी सुभाष यांनी याची पुष्टी केली आणि सांगितले की, त्यांचे कुटुंब सध्या कठीण काळातून जात आहे. कोरोनामुळे त्याचा आंतरराष्ट्रीय प्रकल्प रद्द झाला आणि तेव्हापासून त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

शक्य ते सर्व प्रयत्न करतंय कुटुंब

चित्रपट निर्माते सुभाष यांच्या पत्नी तिलोत्तमा गेल्या पाच वर्षांपासून किडनीच्या आजारामुळे डायलिसिसवर होत्या. पण त्यांच्या प्रकृतीत आणखी काही गुंतागुंत निर्माण झाली आणि त्यांची तब्येत आणखीनच बिघडली. यापूर्वी त्यांना घरी पाठवण्यात आले होते, मात्र आता प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कठीण परिस्थिती असतानाही तिलोत्तम्मांना योग्य उपचार मिळावेत यासाठी बी सुभाष यांचे कुटुंबीय सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

हेही वाचा :

Chhorii | शूटिंगच्या आधीपासूनच प्रेग्नंट बॉडी सूट घालण्यास सुरुवात, नुसरत भरुचाने ‘छोरी’ चित्रपटातील व्यक्तिरेखेसाठी अशी केली तयारी!

Video: साडेचार कोटीच्या ‘लॅम्बॉर्गिनी’च्या बोनटवर ठेऊन कार्तिक आर्यनकडून स्ट्रीट फूडचा आस्वाद, कार्तिकच्या साधेपणाचं सर्वत्र कौतुक

Aai Kuthe Kay Karte | आशुतोषने वाचवला यश जीव, अरुंधतीलाही गाण्याची ऑफर, ऋणानुबंध जुळणार का?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.