Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Disha Patani | टायगर श्रॉफच्या शर्टलेस फोटोवर फिदा झाली दिशा पाटनी, कमेंट करत म्हणाली….

बॉलिवूड अॅक्शन स्टार टायगर श्रॉफ (Tiger Shroff) यावर्षी अनेक नवीन चित्रपटांसह धमाका करण्यास सज्ज झाला आहे. सोशल मीडियावरही त्याच्या पोस्ट्स चित्रपटां इतक्याच धमाका करत असतात. आताही असंच काहीसं झालं आहे. काल संध्याकाळी टायगरने शर्टलेस फोटो शेअर करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे.

Disha Patani | टायगर श्रॉफच्या शर्टलेस फोटोवर फिदा झाली दिशा पाटनी, कमेंट करत म्हणाली....
Tiger Shroff
Follow us
| Updated on: Jan 06, 2022 | 10:54 AM

नवी दिल्ली : बॉलिवूड अॅक्शन स्टार टायगर श्रॉफ (Tiger Shroff) यावर्षी अनेक नवीन चित्रपटांसह धमाका करण्यास सज्ज झाला आहे. सोशल मीडियावरही त्याच्या पोस्ट्स चित्रपटां इतक्याच धमाका करत असतात. आताही असंच काहीसं झालं आहे. काल संध्याकाळी टायगरने शर्टलेस फोटो शेअर करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. यावेळी सगळ्यांच्या नजरा त्याच्या अॅब्सवर खिळल्या होत्या. त्याचवेळी त्याची कथित गर्लफ्रेंड अभिनेत्री दिशा पाटनीही (Disha Patani) या फोटोवर फिदा झाली आहे.

टायगर श्रॉफने इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तो खुर्चीवर बसलेला दिसत आहे. ज्यात मागे झाडाच्या फांद्या देस्खील दिसत आहेत. अभिनेत्याने काळी पँट आणि सनग्लासेससह फर जॅकेट परिधान केले आहे. शर्टलेस पोज देत, तो त्याचे परफेक्ट वॉशबोर्ड अॅब्स फ्लॉंट करताना दिसत आहे.

पाहा पोस्ट :

सर्वात आव्हानात्मक सीन केला पूर्ण!

हा फोटो शेअर करत टायगर श्रॉफने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘हीरोपंती लेव्हल आता दुप्पट झाली आहे! शूट करण्यासाठी सर्वात आव्हानात्मक दृश्यांपैकी एक! मी त्याची एक झलक शेअर करण्यासाठी आता आणखी प्रतीक्षा करू शकत नाही! ईद 29 एप्रिल 2022 रोजी थिएटरमध्ये नक्की पहा.’

दिशाची कमेंट चर्चेत

हा फोटो समोर आल्यानंतर अनेक जण टायगरचे कौतुक करत आहेत. या सर्व कमेंट्समध्ये दिशा पटानीच्या कमेंटकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. टायगर श्रॉफचे सेक्सी अॅब्स पाहून दिशा पाटनी स्वतःला रोखू शकली नाही. टायगर श्रॉफच्या या फोटोवर कमेंट करताना दिशा पाटनीने लिहिले की, ‘मी आता आणखी प्रतीक्षा करू शकत नाही.’ यासोबतच दिशा पटानीने तीन फायर इमोजी देखील शेअर केले आहेत.

चाहत्यांनीही दिली प्रतिक्रिया

दिशाची कमेंट लोकांना त्याबद्दल बोलण्यापासून रोखू शकली नाही. कारण दिशा आणि टायगर एकमेकांना डेट करत आहेत हे सर्वांनाच माहीत आहे, तेव्हा या कमेंटवरच जवळपास 100 रिप्लाय दिसत आहेत. जिथे काही लोकांनी लिहिले आहे की, ‘आम्हीही आता थांबू शकत नाही, लवकर लग्न करा.’ एका चाहत्याने लिहिले, ‘मॅडम तुम्ही कसली पाहत आहात.’, एकाने म्हटले, ‘मी माझ्यापेक्षा तुमच्या लग्नाची वाट पाहत आहे.’

दिशा-टायगरची ‘डेटिंग’

बॉलिवूड स्टार टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांची जोडी बॉलिवूडमध्ये खूप प्रसिद्ध आहे. दिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ वीकेंड, डिनर, व्हेकेशनमध्ये एकमेकांसोबत स्पॉट केले जातात. मात्र, अद्याप दोघांनीही हे नाते अधिकृत केलेले नाही.

हेही वाचा :

Grammy Awards Postponed: ‘ग्रॅमी अवॉर्ड’ला ओमिक्रॉन चा मोठा फटका, जानेवारीत होणारा पुरस्कार सोहळा लांबणीवर!

Shilpa Shetty-Raj Kundra | नव्या वर्षात पहिल्यांदाच शिल्पा शेट्टीने शेअर केला राज कुंद्रासोबतचा व्हिडीओ, जोडीने घेतलं शिर्डीत दर्शन!

Happy Birthday AR Rahman | पोटासाठी मिळेल ते काम करणारा तरुण ते 2 ऑस्कर पटकावणारा ‘मोझार्ट ऑफ मद्रास’, रहमान चा थक्क करणारा प्रवास!

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.