सुपरमॅनच्या ‘Injustice’मध्ये काश्मीरवरून वाद, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
‘सुपरमॅन’ हा जगातील सर्वात लोकप्रिय कॉमिक हिरो आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने त्याची कथा वाचली आणि ऐकली असेल. सुपरमॅनचा नवीन अॅनिमेटेड चित्रपट ‘इनजस्टिस’ रिलीज झाला आहे, ज्यात काश्मीरला वादग्रस्त क्षेत्र म्हणून दाखवण्यात आले आहे.
मुंबई : ‘सुपरमॅन’ हा जगातील सर्वात लोकप्रिय कॉमिक हिरो आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने त्याची कथा वाचली आणि ऐकली असेल. सुपरमॅनचा नवीन अॅनिमेटेड चित्रपट ‘इनजस्टिस’ रिलीज झाला आहे, ज्यात काश्मीरला वादग्रस्त क्षेत्र म्हणून दाखवण्यात आले आहे. संतप्त लोकांनी मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरवर शेअर केलेली क्लिप अपमानजनक असल्याचे म्हणत यावर आक्षेप घेतला आहे. डीसीचा ‘सुपरमॅन’ आणि ‘वंडर वुमन’ काश्मीरवर उड्डाण करणारी लढाऊ विमाने नष्ट करत असल्याचे यात दाखवण्यात आले आहे. व्हिडीओमधील कथा सांगणारे म्हणतात की, ‘सुपर मॅन’ आणि ‘सुपर वंडर वुमन’ काश्मीरला आर्मी फ्री झोन म्हणून घोषित करतात.
DC च्या अॅनिमेटेड फिल्म ‘इनजस्टिस’ची फिक्शन सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यात सुपरमॅन आणि वंडर वुमन हे दोन शक्तिशाली हिरो काश्मीरच्या वादग्रस्त प्रदेशातून लष्करी उपकरणे नष्ट करत आहेत. वापरकर्ते सोशल मीडियावर या कल्पनेवर टीका करत आहेत. व्हिडीओमध्ये, कथा सांगणारा म्हणतो की वादग्रस्त काश्मीरमधील सुपरमॅन आणि वंडर वुमनने लष्करी उपकरणांचा प्रत्येक तुकडा नष्ट केला आहे आणि आता त्याला शस्त्रमुक्त घोषित केले आहे.
Developing story : In the DC’s new film “Injustice”, Superman declares Kashmir an arms free zone. #Kashmir pic.twitter.com/upxyHOn7kA
— The Bite (@_TheBite) October 18, 2021
ट्विटर वापरकर्त्यांनी सांगितले की, इंडियन एअर फोर्स हॉर्नेट, एआयएम -9 एल, साइडविंडर, इन्फ्रा रेड क्लोज कॉम्बॅट मिसाईल इनजस्टिसच्या या लीक क्लिपमध्ये नष्ट झाल्याचे दाखवले आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की भारत अमेरिकेने बनवलेले F-18 हॉर्नेट आणि सुपर हॉर्नेट उडवत नाही. डीसी चित्रपटात दाखवलेले तथ्य चुकीचे आहेत. त्याचबरोबर काही लोक म्हणतात की, काश्मीरला वादग्रस्त क्षेत्र म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीर पूर्णपणे भारताचा भाग आहे, जे पाकिस्तानने जबरदस्तीने व्यापले आहे.
SUPERMAN & Wonder Woman is anti-India! They destroy presumably 2 Indian mig jets in “disputed Kashmir” ?
Courtesy: Injustice 2021 pic.twitter.com/9DTrYMnHnm
— Prakash (@a_Lib_) October 8, 2021
DC latest animated #InjusticeMovie showing Kashmir as disputed territory nd Indian army as villain.
Background voice of this video.? “In disputed Kashmir, Superman nd Wonder Woman destroyed every piece of military equipment, declaring it an arms-free zone.”#AntiIndiaSuperman pic.twitter.com/XbirC7n7lJ
— Monika Singh (@Miss_Singhhh) October 20, 2021
अहवालांनुसार, ‘इनजस्टिस’’ 19 ऑक्टोबर रोजी जगभरात रिलीज होणार होता, परंतु हा चित्रपट एक महिन्यापूर्वी ऑनलाईन लीक झाला होता. किल्प वेबवर हा चित्रपट प्रसारित झाल्यानंतर सोशल मीडिया वापरकर्त्यांनी सांगितले की, डीसी काश्मीरला वादग्रस्त क्षेत्र म्हणून दाखवत आहे आणि भारताच्या चुकीच्या प्रतिमेचे चित्रण करत आहे आणि पाकिस्तानच्या प्रचारात योगदान देत आहे.
हेही वाचा :
Aryan Khan Drugs Case | आर्यन खानच्या जामिनासाठी हायकोर्टात धाव, आता NCB ची पुढची पावलं काय?