Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Birthday Special : रोमँटीक गाणी गाणाऱ्या अरिजीत सिंहचा घटस्फोट, आता एका मुलीच्या आईसोबत थाटला संसार

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अरिजीत सिंह याचा आज वाढदिवस आहे. अरिजीतचे देशाभरामध्ये मोठी फॅन फॉलोइंग आहे.

Birthday Special : रोमँटीक गाणी गाणाऱ्या अरिजीत सिंहचा घटस्फोट, आता एका मुलीच्या आईसोबत थाटला संसार
Follow us
| Updated on: Apr 25, 2021 | 10:34 AM

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अरिजीत सिंह याचा आज वाढदिवस आहे. अरिजीतची देशाभरामध्ये मोठी फॅन फॉलोइंग आहे. आज वाढदिवसानिमित्त अरिजीतच्या वैयक्तिक जीवनाबद्दल आम्ही तुम्हाला खास माहिती सांगणार आहोत. खूप कमी लोकांना माहिती आहे की, अरिजीत सिंहचे दोन लग्न झाले आहेत. अरिजीतचे पहिले लग्न रूपरेखा बनर्जीसोबत झाले होते. (Divorce in one year, Second marriage with a girl’s mother, the story of singer Arijit Singh)

या दोघांची भेट गुरुकुल या रियलिटी शोमध्ये झाली होती. हा शो 2013 मध्ये आला होता. पण या जोडप्याचे लग्न फार काळ टिकले नाही. ज्यानंतर एक वर्षानंतर हे जोडपे वेगळे झाले. त्यानंतर अरिजित सिंहने एका मुलीची आई असलेल्या महिलेसोबत दुसरे लग्न केले. अरिजीतच्या दुसऱ्या पत्नीचे नाव कोयल रॉय असे आहे. विशेष म्हणजे हे दोघेही शालेय मित्र होते. अरिजितने दुसऱ्या लग्नाची बातमी बर्‍याच वर्षांपर्यंत लोकांपासून लपवून ठेवली होती.

सोशल मीडियावर पत्नीबरोबरचा एक फोटो शेअर केला आणि त्या दिवशी सर्वांना त्याचे प्रेम आणि लग्नाविषयी माहिती मिळाली. मीडिया रिपोर्टनुसार, कोयलचे पहिले लग्न यशस्वी झाले नाही, यामुळे तिचा आणि तिच्या नवऱ्याचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर अरिजित आणि कोयल यांनी लग्न केले. कोयलशी असलेल्या त्याच्या नात्याबद्दल बोलताना अरिजित सिंहने एका मुलाखतीत सांगितले होते की, आम्हाला दोघांनाही चित्रपट खूप आवडतात.

लहानपणापासूनच आम्ही दोघांनीही एकत्र चित्रपट बनवायची, पुस्तके लिहायची ठरवले होते. कोयलला लग्नासाठी प्रपोज मी केला होता. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या वेळी अरिजीत सिंह यांने ‘सा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते, या चित्रपटाची संपूर्ण कथा अरिजित आणि कोयल यांनी लिहिली होती. अरिजितने सांगितले होते की, कोयल त्याच्या प्रत्येक नवीन प्रकल्पात मदत करते. कोयलला पुस्तकांचा खूप आवड आहे आणि बर्‍याच प्रकारच्या चित्रपटांमध्येही रस आहे.

संबंधित बातम्या :

‘दे दे प्यार दे’मधील अमिताभ बच्चनची ‘ती’ ट्रेंड स्टेप कोरिओग्राफी नाही तर होता अपघात! वाचा किस्सा….

Video | घरच्या घरी वजन कमी करण्यासाठी नेहा कक्करने शोधून काढली अनोखी शक्कल, पाहा व्हिडीओ

अर्जुनच्या ‘त्या’ कृत्यामुळे महानायकासमोर व्हावे लागले खजील, सचिन तेंडुलकरने सांगितला किस्सा…

(Divorce in one year, Second marriage with a girl’s mother, the story of singer Arijit Singh)

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.