Ajay Devgan | ‘दृश्यम 2’ चित्रपटाच्या निर्मात्यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ…
नोव्हेंबर महिन्यात अजय देवगणचा बहुचर्चित चित्रपट दृश्यम 2 देखील रिलीज होणार आहे.
मुंबई : दिवाळीमध्ये धमाका करण्यासाठी अजय देवगणचा (Ajay Devgan) थँक गॉड हा चित्रपट रेडी आहे. चाहते गेल्या काही दिवसांपासून अजयच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. अक्षय कुमारचा राम सेतू आणि अजय देवगणचा थँक गॉड चित्रपटामध्ये (Movie) काटें की टक्कर होणार हे नक्की आहे. कारण दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येतायत. थँक गॉड हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सतत वादात आहे. कोर्टाने (Court) नुकताच एका याचिकेवर सुनावणी करत असताना थँक गॉड चित्रपटाच्या निर्मात्यांना दिलासा दिलाय. थँक गॉडवर बंदी घालण्याची मागणी करण्यात येतंय.
अजय देवगणचा थँक गॉड हा चित्रपट 25 आॅक्टोबरला प्रेक्षकांचा भेटीला येतोय. त्यानंतर लगेचच नोव्हेंबर महिन्यात अजय देवगणचा बहुचर्चित चित्रपट दृश्यम 2 देखील रिलीज होणार आहे. मात्र, नोव्हेंबरमध्ये जरी हा चित्रपट रिलीज होणार असला तरीही आताच दृश्यम 2 चित्रपटाच्या निर्मात्यांचे टेन्शन वाढवणारी बातमी पुढे येतंय. जर ही बातमी खरी ठरली तर चित्रपट निर्मात्यांचे मोठे नुकसान होऊ शकते.
View this post on Instagram
दृश्यम हा अजय देवगणचा चित्रपट हीट ठरला. त्याचाच दुसरा भाग दृश्यम 2 हा नोव्हेंबरमध्ये रिलीज होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदरच दृश्यमचा मूळ चित्रपट हिंदीत डब होणार असल्याचे सांगितले जातंय. म्हणजेच काय तर दृश्यम 2 रिलीज होण्याच्या साधारण 15 दिवस अगोदर निर्माते मूळ चित्रपट हिंदीत डब करून यूट्यूबवर प्रदर्शित करतील.
मूळ चित्रपट हिंदीत डब होणार असल्याची चर्चा आता जोर धरू लागलीये. जर खरोखरच असे झाले तर अजय देवगणच्या दृश्यम 2 या चित्रपटाला खूप मोठा हा झटका असणार आहे. मात्र, यासंदर्भात अजून चित्रपट निर्मात्यांनी कोणतेही भाष्य केले नाहीये. अजयचा दृश्यम 2 हा चित्रपट प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊन बघावा असे निर्मात्यांचे म्हणणे आहे. मात्र, जर मूळ चित्रपट हिंदीत डब झाल्यावर त्याचा थेट परिणाम हा बाॅक्स आॅफिस कलेक्शनवर होणार हे नक्की.