‘अजय देवगण’च्या दृश्यम 2 चित्रपटाने आठ दिवसांमध्ये केली तब्बल इतक्या कोटींची कमाई
कारण गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडचे चित्रपट सातत्याने बाॅक्स ऑफिसवर फ्लाॅप जात आहेत.
मुंबई : अजय देवगणचा दृश्यम 2 हा चित्रपट ऑफिसवर धमाकेदार कामगिरी करतोय. मागच्या शुक्रवारी हा चित्रपट रिलीज झाला असून आठ दिवस होऊनही बाॅक्स ऑफिसवर चित्रपटाची जादू सुरूच आहे. 2022 हे वर्ष बाॅलिवूडसाठी काही खास गेले नाही. परंतू यामध्ये फक्त अजय देवगणचा दृश्यम 2 हा चित्रपट अपवाद राहिला. कारण गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडचे चित्रपट सातत्याने बाॅक्स ऑफिसवर फ्लाॅप जात आहेत. यामुळे अनेक बिग बजेटचे चित्रपट रिलीज करण्यास निर्माते घाबरत आहेत.
दृश्यम 2 हा चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाने आठव्या दिवशी देखील तब्बल 7.50 कोटींहून अधिक कलेक्शन केले आहे. या चित्रपटात अजय देवगण आणि तब्बू महत्वाच्या भूमिकेत आहेत.
शुक्रवारी वरुण धवनचा भेडिया हा चित्रपट रिलीज झालाय. मात्र, या चित्रपटामुळे दृश्यम 2 ला जास्त फटका नक्कीच बसला नाहीये. भेडिया हा चित्रपट रिलीज होऊनही फक्त 10 टक्के कमी बाॅक्स आॅफिस कलेक्शन दृश्यम 2 चे झाले आहे.
दृश्यम 2 ला रिलीज होऊन आठ दिवस झाले असताना देखील या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. भेडियापेक्षा दृश्यम 2 हा चित्रपट पाहण्यावर प्रेक्षकांचा भर आहे. अर्थातच याचा फटका भेडिया या चित्रपटाला बसणार आहे.
शनिवार आणि रविवाराचे बाॅक्स ऑफिस कलेक्शन दृश्यम 2 चे चांगले राहणार असल्याचे देखील सांगितले जात आहे. दृश्यम 2 चे या आठवड्यातील बाॅक्स ऑफिस कलेक्शन चांगले राहिले तर हा चित्रपट भूल भुलैया 2 ला मागे टाकून 200 कोटींचे कलेक्शन करेल.
आतापर्यंत दृश्यम 2 या चित्रपटाने 110 कोटी रुपयांची कमाई केली आहे. विकेंडचा फायदा चित्रपटाला नक्कीच होईल, असे सांगितले जात आहे. आता पुढील काही दिवस अजय देवगणचा दृश्यम 2 काय धमाका करतो, हे पाहण्यासारखे ठरणार आहे.