Drishyam 2: अखेर 2 ऑक्टोबरचं सत्य बाहेर येणार; विजय कबूल करणार गुन्हा?

'दृश्यम 2'मध्ये सस्पेन्स-थ्रिलरचा डबल डोस; टीझर पाहिलात का?

Drishyam 2: अखेर 2 ऑक्टोबरचं सत्य बाहेर येणार; विजय कबूल करणार गुन्हा?
Drishyam 2 Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 29, 2022 | 2:31 PM

“2 अक्तूबर को क्या हुआ था?”, हा प्रश्न सिनेप्रेमींना चांगलाच माहीत असेल. 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दृश्यम’ या चित्रपटातील हा डायलॉग तुफान गाजला. यावर आजही मीम्स व्हायरल होतात. अजय देवगणची (Ajay Devgn) मुख्य भूमिका असलेला हा सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. साऊथ सुपरस्टार मोहनलाल यांच्या मल्याळम चित्रपटाचा हा हिंदी रिमेक होता. पहिल्या भागाचं यश पाहता निर्मात्यांनी या चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचा निर्णय घेतला आहे. ‘दृश्यम 2’चा (Drishyam 2) टीझर नुकताच प्रदर्शित प्रदर्शित झाला आहे.

या टीझरच्या सुरुवातीला पहिल्या भागातील काही रिकॅप्स पहायला मिळतात. त्यानंतर कॅमेरासमोर विजय साळगावकर (अजय देवगण) त्याच्या गुन्ह्याची कबुली देताना दिसतो. दृश्यममध्ये अजयसोबत श्रिया सरन, इशिता दत्ता, तब्बू यांच्याही भूमिका होत्या. विजय आणि त्याचं संपूर्ण कुटुंब हे आयजी मीरा देशमुखच्या (तब्बू) मुलाची हत्या लपवण्याचा प्रयत्न करत असतात.

हे सुद्धा वाचा

पहा टीझर-

View this post on Instagram

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

“जब कोई गवाह और सबूत नही होता, तो कन्फेशन ही सबसे बडा सबूत बन जाता है,” असा तब्बूचा संवाद या टीझरच्या अखेरीस ऐकायला मिळतो. त्यानंतर अजय कॅमेरासमोर कबुली देताना पहायला मिळतो.

या टीझरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. पहिल्या भागाचा रिकॅप पाहून अंगावर काटा आला, अशी प्रतिक्रिया काहींनी दिली आहे. तर सीक्वेची उत्सुकता आहे, असंही एकाने म्हटलंय.

अभिषेक पाठकने या सीक्वेलचं दिग्दर्शन केलं आहे. पहिल्या भागातील मुख्य कलाकार या सीक्वेलमध्ये दिसणार आहेत. त्याचसोबत अभिनेता अक्षय खन्ना यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. येत्या 18 नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.