Ranveer Singh | या गोष्टीमुळे रणवीर सिंह याचा चित्रपटाच्या सेटवर चढतो पारा
गेल्या कित्येक दिवसांपासून चाहते हे रणवीर सिंह याच्या सर्कस चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता रणवीर सिंह हा त्याच्या आगामी सर्कस या चित्रपटामुळे चर्चेत आहे. सर्कस या चित्रपटामध्ये रणवीर सिंह हा मुख्य भूमिकेत आहे. रोहित शेट्टी, रणवीर सिंह यांच्यासोबत चित्रपटाची टीम प्रमोशनमध्ये बिझी आहे. काही दिवसांपूर्वीच रोहित शेट्टी आणि सर्कसची टीम चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी बिग बाॅस 16 च्या मंचावर पोहचली होती. हा चित्रपट 23 डिसेंबरला रिलीज होतोय. गेल्या कित्येक दिवसांपासून चाहते हे रणवीर सिंह याच्या सर्कस चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.
नुकताच दिलेल्या एक मुलाखतीमध्ये रोहित शेट्टी याने सांगितले की, रणवीर सिंहला चित्रपटाच्या सेटवर प्रचंड राग येतो. विशेष म्हणजे यासोबतच रोहित शेट्टी याने हेही कारण सांगून टाकले आहे की, रणवीर सिंह याला नेमक्या कोणत्या गोष्टींमुळे राग येतो आणि त्याचा पारा चढतो.
View this post on Instagram
रोहित शेट्टी म्हणाला की, परफेक्शनिस्ट रणवीर सिंह असल्याने अनेकदा त्याला राग येतो. खरेतर समस्या अशावेळी येते की समोरचा अभिनेता हा परफेक्ट नसतो. एखादा अभिनेता हा रणवीर सिंह याच्या स्पीडने काम करून शकत नसला तर याचा परिणाम हा रणवीरवर होतो.
पुढे रोहित शेट्टी म्हणाला जो व्यक्ती रागावतो आणि चिडतो हो मनाचा स्वच्छ असतो. जो व्यक्ती 24 तास चेहऱ्यावर हास्य ठेवतो तो खूप जास्त धोकादायक असतो. कारण ज्याचे मन साफ असते, ते मनात जे काही आहे ते बोलून टाकतात. मात्र, शांत राहणारे व्यक्ती सर्वात धोकादायक असतात.
यावर रणवीर सिंह म्हणाला की, सिंसियर नसलेला अभिनेता पाहिला की मला खरोखरच खूप जास्त राग येतो. रणवीर सिंह हा त्याच्या हटके स्टाईलसाठी ओळखला जातो. काही दिवसांपूर्वी रणवीर सिंह याने एक फोटोशूट केले होते, ज्यावरून त्यावर मोठी टीका करण्यात आली होती.