चक्क अक्षय कुमार याच्याकडे नरेंद्र मोदी यांनी केली होती ट्विंकल खन्ना हिची तक्रार, वाचा काय घडले
बाॅलिवूड अभिनेता अक्षय कुमार याचा सेल्फी हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच रिलीज झालाय. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना अक्षय कुमार हा दिसला होता. मात्र, या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आणि हा चित्रपट फ्लाॅप गेला.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) हा कायमच चर्चेत राहतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमार याचे चित्रपट एका मागून एक असे बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप जाताना दिसत आहेत. अक्षय कुमार याचे वर्षाला तब्बल चार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतात. असेही म्हटले जाते की, अक्षय कुमार हा बाॅलिवूड (Bollywood) अभिनेत्यांपैकी सर्वात जास्त फी घेणारा अभिनेता आहे. काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमार याने हेरा फेरी 3 या चित्रपटाला नकार दिला होता. एका मुलाखतीमध्ये बोलताना अक्षय कुमार म्हणाला की, मला हेरा फेरी 3 चित्रपटाची स्क्रीप्ट आवडली नसल्याने मी चित्रपटाला नकार दिला.
अक्षय कुमार याने चित्रपटाला नकार दिल्याचे कारण ऐकून चाहत्यांनी मोठा धक्का बसला होता. यानंतर चित्रपट निर्मातेही अक्षय कुमार याच्यावर नाराज झाले. अक्षय कुमार ऐवजी कार्तिक आर्यन हा चित्रपटामध्ये दिसणार असल्याची चर्चा होती. चित्रपट निर्माते अक्षय कुमार याच्यासोबत कार्तिक आर्यन याच्याही संपर्कात होते.
शेवटी अचानकच अक्षय कुमार याने हेरा फेरी 3 या चित्रपटाला होकार दिला. अक्षय कुमार याचे तब्बल पाच चित्रपट फ्लाॅप गेले आहेत. काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमार याचा सेल्फी हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाला बाॅक्स आॅफिसवर धमाका करण्यात यश मिळाले नाही आणि हा चित्रपट फ्लाॅप गेला.
काही दिवसांपूर्वी अक्षय कुमार याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक मुलाखती घेतली होती आणि या मुलाखतीनंतर अक्षय कुमार हा चर्चेत आला. या मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच अक्षय कुमार या मोठा प्रश्न विचारला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अक्षय कुमार याला म्हणाले होते की, तुझे कौटुंबिक आयुष्य खूप छान जात असेल ना?
कारण मी तुझे आणि ट्विंकल खन्नाचे ट्विटर बघतो. ट्विंकल खन्ना तिचा संपूर्ण राग हा माझ्यावरच काढते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे बोलणे ऐकून अक्षय कुमार हसताना दिसला. बऱ्याच वेळा ट्विंकल खन्ना काही गोष्टींवरून सरकारवर टिका करताना दिसते. यावरून नरेंद्र मोदी हे बोलताना दिसले.
अक्षय कुमार हा सेल्फी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसला होता. चाहत्यांमध्ये अक्षय कुमार याच्या सेल्फी चित्रपटाबद्दल मोठी क्रेझ बघायला मिळत होती. मात्र, प्रत्यक्षात रिलीज झाल्यावर हा चित्रपट फ्लाॅप गेला. कार्तिक आर्यन याचाही शहजादा हा चित्रपट फ्लाॅप गेला. अक्षय कुमार याचे चित्रपट सतत फ्लाॅप जात असल्याने त्याने आपली फी कमी केल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी होती.