मुंबई : अश्लील चित्रपट बनवून ते विकल्या प्रकरणी अटकेत असलेल्या राज कुंद्राच्या (Raj Kundra) काळ्या पैशाचे रहस्य पीएनबी बँके खात्यात दडले आहे. राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) यांचे पीएनबी बँकेत संयुक्त खाते आहे. याशिवाय राज कुंद्रा यांचेही पीएनबीमध्ये सिंगल (एकट्याचे) खाते देखील आहे, ज्यामध्ये 2016 पासून कोणताही व्यवहार झालेला नाही.
प्लेसमेंट लेअरिंग आणि इंटीग्रेशन अंतर्गत, इतर खात्यात पैसे लपवले गेले आहेत. राज कुंद्राच्या बँक खात्याच्या तपास गुन्हे शाखेची 4 सदस्यांची टीम करत आहे. कोरोना काळात राज कुंद्राची कमाई क्रिप्टो करेंसीमध्ये झाली आहे. ‘सीक्रेट अलमारी’मध्ये आढलेळल्या कागद पत्रांच्या आधारे हा खुलासा झाला असल्याचे म्हटले जात आहे.
राज कुंद्रा यांच्याबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. त्यातीलच एक म्हणजे त्यांच्या खात्यात रोज होणारं लाखो रुपयांचं डिपॉझिट! राज कुंद्रा यांचे काही बँक डिटेल्स हाती लागले आहेत. त्यात Hotshots डिजिटल प्लॅटफॉर्मवर अश्लील चित्रपट टाकून राज कुंद्रा यांच्या खात्यात रोज किती रुपये जमा होत होते याची आकडेवारी समोर आली आहे.
हाती लागलेल्या एक्स्क्लुझिव्ह बँक डिटेल्सनुसार राज कुंद्रा आणि त्यांची कंपनी दिवसाला 1 ते 10 लाख रुपये कमवत होते. त्यांच्या बँक अकाऊंटवर रोज लाखो रुपये जमा होत असल्याचं बँक डिटेल्सवरुन उजेडात आलं आहे. ही रोजची आकडे लाखो रुपयांच्या घरात आहे. त्यामुळे या उद्योगातून राज कुंद्रा हे किती रुपयांची कमाई करत होते, याचा अंदाज बांधणही कठीण आहे.
राज कुंद्रा यांच्या विरोधात मुंबई पोलिसांच्या हाती भक्कम पुरावे आहेत. त्यांच्याविरोधात अनेक आयपीसी कलमांसोबतच आयटी अॅक्ट कलम 67, 67A लावले गेले आहेत. त्यातील 67A हे पोर्नोग्राफी संदर्भात आहे. तो अजामीनपात्र गुन्हा आहे. त्यात पहिल्यांना गुन्हा केला असेल तर 3 वर्षाची शिक्षा आणि 5 लाख रुपये दंड आकारला जातो. एकाच व्यक्तीने दुसऱ्या वेळीही तोच गुन्हा केल्यानंतर तर त्याला 5 वर्षाची शिक्षा आणि 10 लाख रुपये दंड आहे. तर तिसऱ्यांदा गुन्हा केल्यास 7 वर्षाची शिक्षा आणि 10 लाख रुपये दंडाची तरदूत असल्याची माहिती कायदे विशेषज्ञ आणि सायबर एक्सपर्ट प्रशांत माळी यांनी दिलीय.
(Earnings in cryptocurrency, secret of Raj Kundra’s black money in PNB bank account)