Padma Shri Awards | एकता कपूर, करण जोहर आणि कंगना रनौत ‘या’ दिवशी स्वीकारणार पद्मश्री पुरस्कार!

एकता कपूर (Ekta Kapoor), कंगना रनौत (Kangana Ranaut) आणि करण जोहर (Karan Johar) यांना पद्मश्री पुरस्कार (Padma Shri Awards) मिळाल्याची बातमी गेल्या वर्षी जाहीर झाली होती. या तिन्ही सेलिब्रिटींना आपापल्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

Padma Shri Awards | एकता कपूर, करण जोहर आणि कंगना रनौत ‘या’ दिवशी स्वीकारणार पद्मश्री पुरस्कार!
Kangana-Karan-Ekta
Follow us
| Updated on: Nov 02, 2021 | 10:25 AM

मुंबई : एकता कपूर (Ekta Kapoor), कंगना रनौत (Kangana Ranaut) आणि करण जोहर (Karan Johar) यांना पद्मश्री पुरस्कार (Padma Shri Awards) मिळाल्याची बातमी गेल्या वर्षी जाहीर झाली होती. या तिन्ही सेलिब्रिटींना आपापल्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. आता नवीन अपडेट समोर आली आहे की, या तिघांनाही हा पुरस्कार 8 नोव्हेंबर रोजी दिल्लीत दिला जाणार आहे.

पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, हा एक सरकारी सोहळा असून सर्व विजेत्यांना आमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. निमंत्रण मिळाल्यानंतर सर्वांनाच हा मोठा सन्मान मिळावण्याची उत्सुकता आहे. जितेंद्र देखील या कार्यक्रमाचा एक भाग असणार आहेत. ते लेक एकता कपूरसोबत येणार आहेत. खरं तर, एकताला तिच्या वडिलांनी आपला हा मोठा सन्मान पाहावा अशी इच्छा आहे. आतापर्यंत ज्या काही औपचारिकता होत्या, त्या पूर्ण झाल्या आहेत.

विजेत्यांची घोषणा झाली तेव्हा एकता म्हणाली होती की, ‘ही बातमी ऐकून मी खूप आनंदी आणि भावूक झालो आहे. मी वयाच्या 17 व्या वर्षी काम करायला सुरुवात केली. मला खूप बोलले गेले की, तू खूप लहान आहेस आणि तुझा काम करण्याचा निर्णय खूप लवकर घेतला आहे. वर्षानुवर्षे मी हे शिकले आहे की, आपले स्वप्न जगणे कधीही सहज शक्य नसते. आज या मोठ्या सन्मानासाठी माझे नाव पुढे आले आहे, हे जाणून मला कसे वाटते ते मी शब्दांत सांगूच शकत नाही.

काय म्हणाला करण जोहर?

करण जोहरही या पुरस्काराबद्दल उत्साहित आहे. करणने मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा तो ‘तख्त’ या चित्रपटासाठी रेकी करत होता तेव्हा त्याला हे कळले होते. तो म्हणाला होता, ‘मला धक्काच बसला. त्यावेळी माझी आई आणि मुलांशी बोलून त्यांना ही गोड बातमी द्यायची होती, पण तसे झाले नाही. मला खरंच एका अनोळखी नंबरवरून फोन आला. साधारणपणे मी अनोळखी नंबरवरून आलेले कॉल उचलत नाही, पण त्या दिवशी मी फोन उचलला. तो फोन चांगला होता, कारण तो काल मंत्रालयाकडून होता. हे माझ्यासोबत घडतंय यावर माझा विश्वासच बसत नव्हता. मी त्यांचे आभार मानले आणि फोन ठेवल्यावर मी पूर्णपणे गप्प बसले. मला ही बातमी मिळाली तेव्हा मी एकटाच होतो. नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम होता, पण तरीही मी आईला फोन केला. मला पद्मश्री मिळणार हे सांगताच ती रडली.’

कंगनाने पुरस्कार महिलांना समर्पित केला!

त्याचवेळी कंगना म्हणाली होती की, ‘ही बातमी ऐकून मला खूप सन्मान वाटत आहे. मला या मोठ्या पुरस्काराने सन्मानित करण्याची संधी दिल्याबद्दल मी आपल्या देशाचे आभार मानते. मला हा पुरस्कार प्रत्येक स्त्रीला समर्पित करायचा आहे जी, स्वप्न पाहण्याचे धाडस करते. हा पुरस्कार मी प्रत्येक आईला, प्रत्येक मुलीला, प्रत्येक स्त्रीला समर्पित करेन.’

हेही वाचा :

Happy Birthday Esha Deol | ज्याच्या कानाखाली काढला आवाज, त्याच्याशीच दोनदा बांधली लग्नगाठ! ‘अशी’ होती ईशा देओलची प्रेमकथा…

सुष्मिता सेन ‘आत्या’ झाली, अभिनेत्री चारू असोपा-राजीव सेन यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.