BMC election : काँग्रेसकडून थेट महापौरपदाची ऑफर, सोनू सूदची पहिली रोखठोक प्रतिक्रिया

बीएमसी 2022 च्या निवडणुकीत काँग्रेस अनेक बड्या चित्रपट कलाकारांवर पैज लावणार आहे. त्यातच अभिनेता सोनू सूदचा समावेश आहे. (Will Sonu Sood contest BMC elections on Congress ticket? The truth told to TV9)

BMC election : काँग्रेसकडून थेट महापौरपदाची ऑफर, सोनू सूदची पहिली रोखठोक प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Aug 24, 2021 | 6:42 AM

मुंबई : 2022 मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC Elections 2022) मुंबईत निवडणुका होणार आहेत, ज्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी आता तयारी सुरू केली आहे. दरम्यान, एक मोठी बातमी समोर आली आहे की बीएमसी 2022 च्या निवडणुकीत काँग्रेस अनेक बड्या चित्रपट कलाकारांवर पैज लावणार आहे. यापैकी एका नावामध्ये अभिनेता सोनू सूदचा समावेश आहे, तोच सोनू सूद जो लॉकडाऊनमध्ये लोकांचा रिअल लाईफ हिरो बनला. काँग्रेस सोनू सूदच्या नावावरही चर्चा करत असल्याचं बोललं जात होतं.

तर टीव्ही 9 च्या टीमनं सोनू सूदशी या प्रकरणाबद्दल संपर्क साधला. तेव्हा त्यानं या गोष्टीवर पूर्णपणे नकार दिला आणि या माहितीमध्ये किती सत्य आहे हे देखील त्यानं सांगितलं आहे. आम्ही सोनू सूदला विचारलं की ते काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहेत का? सोनू सूदनं आपल्या उत्तरात म्हटले- नाही, यात काहीच तथ्य नाही.

सोनू सूद व्यतिरिक्त या स्टार्सच्या नावांचीही चर्चा

न्यूज 18 मधील एका रिपोर्टनुसार, कॉंग्रेसच्या अंतर्गत समितीनं बीएमसी 2022 च्या निवडणुकीसाठी सोनू सूद, मिलिंद सोमण आणि रितेश देशमुख यांच्या नावांवर चर्चा केली आहे. एवढी मोठी बातमी समोर आल्यानंतर, असा अंदाज बांधला जाऊ लागला की काँग्रेसनं या स्टार्सशी निवडणुकीबद्दल बोललेलं आहे. मात्र, यात काहीच तथ्य नाही. बीएमसी निवडणुकांबाबत काँग्रेसनं मिलिंद सोमण, रितेश देशमुख आणि सोनू सूद यांच्याशी काहीही बोललेलं नाही.

रितेश देशमुखचं कुटुंब राजकारणाशी संबंधित आहे. अशा परिस्थितीत, एकदा विचार केला जाऊ शकतो की तो देखील आपल्या वडिलांप्रमाणे आणि भावांप्रमाणे राजकारणात प्रवेश करू शकतो. मात्र, रितेशनं आपल्या मुलाखतींमध्ये हे अनेक वेळा सांगितलं आहे की, त्याला राजकारणात रस नाही. त्याच वेळी, सोनू सूदबद्दल बोलायचं झालं तर, राजकारणात येण्यासाठी त्याचं नाव येण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही सोनू सूद राजकारणात प्रवेश करण्याच्या अफवा पसरल्या आहेत.

बॉलिवूड हंगामाला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सोनू सूदनं एकदा म्हटलं होतं – अभिनेता म्हणून माझ्यासाठी खूप पुढे जाण्याची संधी आहे. मी जी स्वप्ने घेऊन आलो ती अजून पूर्ण व्हायची आहेत. मला वाटतं की त्यांची पूर्तता सर्वप्रथम करायला हवी. राजकारणात येण्यासाठी कोणतीही निश्चित वेळ आणि निश्चित कालावधी नसतो. मी 5 किंवा 10 वर्षांनंतर सामील होऊ शकतो. मला दहा वर्षांपूर्वी ऑफर्स मिळाल्या आणि अजूनही येत आहेत, पण मला स्वारस्य नाही.

संबंधित बातम्या

राघव स्टारर ‘कांचना 3’ अभिनेत्री अलेक्झांडरचा संशयास्पद मृत्यू, ब्लॅकमेलिंगबाबत 2019 मध्ये केली होती एफआयआर

राधिकाचा आपटेचा ‘हा’ फोटो पाहून नेटकऱ्यांना आठवली मनी हाईस्टची ‘नायरोबी’, पाहा PHOTO

Zoya Afroz : मुंबईच्या झोया अफरोजला मिस इंडिया इंटरनॅशनलचा मुकूट, पाहा तिचे खास फोटो

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.