Expensive Gift | ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी राज कुंद्राने शिल्पा शेट्टीला दिली होती 100 कोटींची भेट!
बॉलिवूडमध्येही 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्यासाठी बॉलिवूड स्टार्सना खूप संघर्ष करावा लागतो. पण राज कुंद्राने शिल्पा शेट्टीला 100 कोटींची भेट देत, तिला खरोखर आश्चर्यचकित केले होते.
मुंबई : 19 जुलै रोजी गुन्हे शाखेने शिल्पा शेट्टीचे (Shilpa Shetty) पती राज कुंद्रा (Raj Kundra) यांना अश्लील चित्रपट बनवून ते एका अॅपवर वितरीत केल्याबद्दल दीर्घ चौकशी केल्यानंतर अटक केली. त्यानंतर राज कुंद्राबद्दल सातत्याने अनेक नवीन खुलासे होत आहेत. पण, आज आम्ही तुम्हाला या वादाबद्दल सांगणार नाही तर शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याशी संबंधित अशा एका गोष्टीबद्दल सांगणार आहोत, जे ऐकल्यानंतर तुम्हाला देखील नक्कीच आश्चर्य वाटेल.
राज कुंद्राने शिल्पाला दिली 100 कोटींची भेट
बॉलिवूडमध्येही 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्यासाठी बॉलिवूड स्टार्सना खूप संघर्ष करावा लागतो. पण राज कुंद्राने शिल्पा शेट्टीला 100 कोटींची भेट देत, तिला खरोखर आश्चर्यचकित केले होते. रिपोर्ट्सनुसार, राज कुंद्राने 2009 मध्ये व्हॅलेंटाईनच्या निमित्ताने शिल्पा शेट्टीला अशी अनोखी भेट दिली, ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. माध्यमांच्या वृत्तानुसार त्याने आयपीएलची एक टीम 100 कोटी रुपयांना विकत घेतली होती आणि ती शिल्पा शेट्टीला भेट म्हणून दिली होती. 2009 मध्ये राज आणि शिल्पा राजस्थान रॉयल्स संघाचे सह-मालक बनले होते.
शिल्पा म्हणाली हा तर बिझनेसचा नवा पर्याय!
मीडिया रिपोर्ट्सनुसार, राज कुंद्राने शिल्पाला व्हॅलेंटाईनच्या निमित्ताने हा संघ भेट दिला होता. प्रसारमाध्यमांशी खास संभाषणादरम्यान शिल्पाने याला राज कुंद्राच्या बुद्धिमान व्यवसाय धोरणाचा भाग म्हटले होते. आर्थिक मंदीच्या त्या काळात, जेव्हा शिल्पा शेट्टीला 100 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीबद्दल विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली की, “गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्हाला भीती वाटत नाही, तेव्हा गुंतवणूकदार शहाणा असल्याचे म्हटले जाते.”
शिल्पा म्हणाली, अजिबात भीती वाटत नाही!
मंदीच्या काळात प्रत्येकाला आपले पैसे बुडण्याची भीती ही असते. मीडिया रिपोर्टनुसार, अशा स्थितीत, जेव्हा शिल्पा शेट्टीला विचारण्यात आले की, ती एवढ्या मोठ्या गुंतवणुकीला घाबरत नाही का?, तेव्हा शिल्पा म्हणाली, ‘मी अजिबात घाबरत नाही. कारण राजस्थान रॉयल्स खूप चांगली टीम आहे आणि जसे मी सांगितले, आर्थिक मंदी असो, काहीही झाले तरी क्रिकेट कधीही बाहेर होणार नाही.’
राजच्या महागड्या गिफ्टवर शिल्पा शेट्टीची प्रतिक्रिया
रिपोर्ट्सनुसार, जेव्हा एका रिपोर्टरने शिल्पा शेट्टीला विचारले की, तिला राजस्थान रॉयल्स टीम व्हॅलेंटाईन गिफ्ट म्हणून मिळाल्याचा आनंद झाला आहे का? शिल्पाने उत्तर दिले की, ‘ही भेट खूप महाग आहे, मला भरपूर आनंद झालाच पाहिजे.’ हे बोलल्यावर शिल्पा शेट्टी हसायला लागली होती.
राज म्हणाला, ही भेट दोघांसाठी!
अहवालांनुसार, याविषयी बोलताना राज कुंद्रा म्हणाला की, ‘ही भेट केवळ माझ्याकडूनच नाही तर, ती शिल्पा शेट्टी कडूनही होती. तर, ही भेट आम्हा दोघांसाठी आहे आणि मला खात्री आहे की, ती आम्हा दोघांसाठी आतापर्यंतची सर्वात महागडी भेट आहे.’
बरं, शिल्पाला इम्प्रेस करण्याची ही पहिलीच वेळ नाही, राज कुंद्राने आधीही तिला अनेक महागड्या भेटवस्तू दिल्या आहेत. याआधीही त्याने तिला 3 कोटींची अंगठी, बुर्ज खलिफामधील घर यासह अनेक महागड्या भेटवस्तू दिल्या आहेत.
(Expensive Gift On Valentine’s Day, Raj Kundra gave Shilpa Shetty a gift of Rs 100 crore)
हेही वाचा :
‘जोधा अकबर’ फेम अभिनेता मोठ्या आर्थिक अडचणीत, आजारपणामुळे कापावा लागला पाय