Fact Check :  लालबागच्या राजाचा जुना ‘फर्स्ट लूक’ व्हायरल, ‘बिग बी’ही फसले

रम्यान, बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) ‘लालबागच्या राजा’ची पहिली झलक दाखवणारा एक व्हिडीओ त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर करताना अमिताभ यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, 'ओम गण गणपतये नमः.. गणपती बाप्पा मोरया..पहला दर्शन, लालबागचा राजा.'. मात्र, इथेच ‘बिग बी’ देखील फसले आहेत.

Fact Check :  लालबागच्या राजाचा जुना 'फर्स्ट लूक' व्हायरल, 'बिग बी'ही फसले
लालबागचा राजा
Follow us
| Updated on: Sep 08, 2021 | 5:41 PM

मुंबई : दरवर्षी प्रमाणे याही वर्षी देशभरात गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. गणेशोत्सवाचे नाव येताच मुंबईच्या ‘लालबागचा राजा’ची (Lalbaugcha Raja)  मूर्ती आणि सजावट यंदा कशी असेल, याची चर्चा अधिक असते. कोरोना कालावधीमुळे, गणेशोत्सव साजरा करताना काही महत्त्वाचे प्रोटोकॉल सेट केले गेले आहेत. एकीकडे ‘लालबागचा राजा’च्या स्वागताची तयारी जोरात सुरू झाली आहे. तर, दुसरीकडे मुंबईतील इतर गणपती देखील चर्चेत आहेत.

दरम्यान, बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) ‘लालबागच्या राजा’ची पहिली झलक दाखवणारा एक व्हिडीओ त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर करताना अमिताभ यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, ‘ओम गण गणपतये नमः.. गणपती बाप्पा मोरया..पहला दर्शन, लालबागचा राजा.’. मात्र, इथेच ‘बिग बी’ देखील फसले आहेत. अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ यंदाचा नसून, खूप जुना आहे.

लालबागच्या राजाचा जुना ‘फर्स्ट लूक’ व्हायरल

दोन दिवसांपासून हाच व्हिडीओ लालबागच्या राजाची यंदाची अर्थात 2021 या वर्षातील मूर्तीची पहिली झलक म्हणून हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. याच व्हायरल व्हिडीओला शेअर करण्याचा मोह अमिताभ बच्चन यांना देखील आवरला नसावा त्यांनी त्यांच्या सर्व सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. मात्र, हा व्हिडीओ यंदाचा नसून, वर्ष 2016 म्हणजेच 5 वर्ष जुना आहे.

या व्हायरल व्हिडीओत दिसणारी गणपती बाप्पाच्या मूर्तीची उंची आणि समोर जमलेली गर्दी पाहताच हा व्हिडीओ जुना असल्याचे लक्षात येते. यंदा कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेता सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत गृह विभागाचे उपसचिव (विशेष) यांच्याकडून शासकीय मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. या सूचनेनुसार, यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतींची सजावट करतांना त्यात भपकेबाजी नसावी. श्रीगणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळांकरीता 4 फूट आणि घरगुती गणपती 2 फूटांच्या मर्यादेत असावी. यावर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमूर्तीं ऐवजी घरातील धातू/संगमरवर आदी मुर्तींचे पूजन करावे, असे साग्न्यात आले आहे. तर यंदा लालबागच्या राजाची मूर्ती स्थापन करण्यात येणार असली तरी नियमांनुसार ती 4 फुटांची असणार आहे.

जुन्या व्हिडीओवरही लाखो व्ह्यूव्ज

अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे. चाहतेही भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडीओ जुना असला तरी भक्तांना तो खूप आवडला आहे. बिग बींनी शेअर केलेल्या या व्हिडीओवर आतापर्यंत 9 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत.

हेही वाचा :

सलमान खानला मुंबई कोर्टाकडून दिलासा, प्लेस्टोअरच्या ‘सेलमोन भोई’ गेमवर घातली तत्काळ बंदी!

Thalaivii Review : कंगना रनौतच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट, वाचा चित्रपटगृहात प्रदर्शित होणाऱ्या ‘थलायवी’बद्दल…

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.