अमिताभ, अजय देवगनच्या सहकलाकाराचं निधन, 35व्या वर्षी प्राणज्योत मालवली; मृत्यूचं कारण धक्कादायक

बॉलिवूडमधून अत्यंत दु:खद बातमी आहे. अभिनेता अपूर्व शुक्ला यांचं निधन झालं आहे. वयाच्या अवघ्या 35 व्या वर्षी त्यांचं निधन झालं. भोपाळमधील घरात त्यांचा मृतदेह आढळून आला. बॉलिवूडमध्ये दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केलेल्या अपूर्व यांनी सर्वांशी संपर्क तोडला होता. ते एकटेच राहत होते. त्यांच्या मृत्यूची बातमी शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला.

अमिताभ, अजय देवगनच्या सहकलाकाराचं निधन, 35व्या वर्षी प्राणज्योत मालवली; मृत्यूचं कारण धक्कादायक
Apoorva ShuklaImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 24, 2023 | 10:21 PM

मुंबई | 24 डिसेंबर 2023 : बॉलिवूडमधून एक दु:खद आणि धक्कादायक बातमी आहे. प्रसिद्ध अभिनेते अपूर्व शुक्ला यांचं निधन झालंय. वयाच्या अवघ्या 35 व्या वर्षी अपूर्व यांनी जगाचा निरोप घेतला. भोपाळमधील हमीदिया रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अपूर्व गेल्या काही महिन्यांपासून डिप्रेशनच्या आजाराने ग्रस्त होते. त्यांच्यावर उपचारही सुरू होते. त्यानंतर ते घरी आले होते. घरीच त्यांचा मृत्यू झाला. अपूर्व यांनी बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांसोबत काम केलंय. त्यांनी अनेक टीव्ही शोमध्येही काम केलं. पत्रकारिता जगतातही ते सक्रिय होते.

तीन वर्षापूर्वी अपूर्व यांची आई इंदिरा यांचं निधन झालं होतं. त्यामुळे ते कोलमडून गेले होते. त्यानंतर एक वर्षापूर्वी अपूर्व यांचे वडील पंकज शुक्ला यांचं निधन झालं होतं. वडिलांच्या निधनाचा त्यांना प्रचंड धक्का बसला होता. त्यामुळे ते हळूहळू डिप्रेशनमध्ये गेले होते. त्यातून ते बाहेरच आले नाही. अपूर्व हे आधी वडील पंकज शुक्ला आणि आई इंदिरा शुक्ला यांच्यासोबत जहांगीरबाद येथील अहीर मोहल्ला येथे राहत होते. वडिलांच्या निधानानंतर त्यांनी घर सोडलं आणि रैन बसेरा येथे राहायला आले होते. त्यांनी सर्वांशी संपर्कही तोडला होता. बुधवारी पोलिसांना फोन आला. रैन बसेरा येथे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केल्यावर अपूर्व शुक्ला यांचा मृतदेह आढळून आला.

खिशात चिठ्ठी आणि मोबाईल नंबर

अपूर्व शुक्ला यांच्या खिशात पोलिसांना एक चिठ्ठी सापडली. त्या चिठ्ठीवर एक मोबाईल नंबर होता. पोलिसांनी हा नंबर डायल केल्यावर तो नंबर अपूर्व शुक्लाच्या मावशीचा असल्याचं समजलं. मावशीकडूनच अपूर्व शुक्लाबाबतची माहिती मिळाली. तसेच अपूर्व गेल्या काही महिन्यांपासून डिप्रेशनने ग्रस्त झाल्याचंही कळलं होतं. अपूर्व हे अभिनेते आणि पत्रकारही होते, असं त्यांच्या मावशीने सांगितलं. अपूर्व यांचे वडीलही पत्रकार होते.

अमिताभ सोबत काम

अपूर्व यांनी त्यांच्या फिल्मी करिअरची सुरुवात टीव्ही शोमधून केली. त्यांनी अमिताभ बच्चन आणि अजय देवगन यांच्या सिनेमातही काम केलं. चक्रव्यूह, सत्याग्रह, जय गंगाजल आणि तबादला सारख्या सिनेमात त्यांनी काम केलं. त्याशिवाय ते झी टीव्ही आणि सोनी टीव्हीवरील काही एपिसोडमध्येही दिसले होते.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.