Shah Rukh Khan: एअरपोर्टवर चाहत्याने हात पकडताच भडकला शाहरुख; आर्यनने वडिलांना सावरलं

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी संबंधित चाहत्यावर टीका करत आहेत. 'हे अत्यंत चुकीचं वागणं आहे', असं एकाने म्हटलं. तर 'त्यांचं खासगीपण जपा' असं दुसऱ्या युजरने लिहिलं.

Shah Rukh Khan: एअरपोर्टवर चाहत्याने हात पकडताच भडकला शाहरुख; आर्यनने वडिलांना सावरलं
Shah Rukh Khan: एअरपोर्टवर चाहत्याने हात पकडताच भडकला शाहरुखImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 08, 2022 | 2:02 PM

बॉलिवूड सेलिब्रिटींचे चाहते त्यांच्या आवडत्या स्टार्सना भेटण्यासाठी किंवा त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी खूपच उत्सुक असतात. अनेकदा हे सेलिब्रिटी चाहत्यांच्या गर्दीने घेरले जातात किंवा गर्दीत त्यांच्याशी गैरवर्तन झाल्याचं अनेकदा घडलं आहे. असाच काहीसा प्रकार बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानसोबत (Shah Rukh Khan) विमानतळावर घडला. मात्र हा चाहता शाहरुखच्या आणखी जवळ येण्याआधीच त्याचा मुलगा आर्यनने मध्ये येत वडिलांना सावरलं. रविवारी संध्याकाळी शाहरुख त्याच्या दोन्ही मुलांसोबत मुंबई विमानतळावर दिसला. एअरपोर्टवर आर्यन खान आणि त्याचा लहान भाऊ अबरामही त्याच्यासोबत होता. दरम्यान एका चाहत्याने मध्येच येऊन शाहरुखचा हात पकडून सेल्फी (Selfie) घेण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे शाहरुखला धक्काच बसला. शाहरुखने रागाच्या भरात लगेच हात झटकला आणि मागे गेला. इतक्यात आर्यन (Aryan Khan) पुढे येऊन वडील आणि भावाच्या मध्ये उभा राहिला.

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी संबंधित चाहत्यावर टीका करत आहेत. ‘हे अत्यंत चुकीचं वागणं आहे’, असं एकाने म्हटलं. तर ‘त्यांचं खासगीपण जपा’ असं दुसऱ्या युजरने लिहिलं. ‘शाहरुख त्याच्या मुलांसोबत होता. सेलिब्रिटी म्हणजे पब्लिक प्रॉपर्टी नसतात हे समजलं पाहिजे’ असंही एकाने म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ-

शाहरुख खान सध्या राजकुमार हिरानी यांच्या ‘डंकी’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. लंडनमध्ये तो तापसी पन्नूसोबत या चित्रपटाचं शूटिंग करत होता. लवकरच या चित्रपटाच्या पुढील शेड्यूलचं शूटिंग पंजाबमध्ये होणार आहे. याशिवाय शाहरुखच्या आगामी ‘पठान’ या चित्रपटाचीही प्रचंड उत्सुकता आहे. यामध्ये त्याच्यासोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम दिसणार आहेत. या दोन चित्रपटांशिवाय शाहरुख दक्षिणेतील दिग्दर्शक अटलीसोबत ‘जवान’ या अॅक्शन चित्रपटासाठीदेखील शूट करणार आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत साऊथची अभिनेत्री नयनतारा दिसणार आहे.

मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.