Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vijay Deverakonda: विजय देवरकोंडाची एक झलक पाहण्यासाठी तुंबड गर्दी; पहा साऊथ ॲक्टरचा मराठी अंदाज

हा व्हिडिओ पाहून असा अंदाज व्यक्त केला जात होता की तो हैदराबादमधील असेल, जिथे विजयचे असंख्य चाहते आहेत. पण विजय देवरकोंडा आता संपूर्ण भारतात सुपरस्टार बनला आहे आणि याचा पुरावा म्हणजे हा त्याचा व्हायरल व्हिडिओ आहे.

Vijay Deverakonda: विजय देवरकोंडाची एक झलक पाहण्यासाठी तुंबड गर्दी; पहा साऊथ ॲक्टरचा मराठी अंदाज
Vijay Deverakonda: विजय देवरकोंडाची एक झलक पाहण्यासाठी तुंबड गर्दीImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Aug 01, 2022 | 10:31 AM

विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि अनन्या पांडे (Ananya Panday) हे त्यांच्या आगामी ‘लायगर’ (Liger) या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. या दोघांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून असा अंदाज व्यक्त केला जात होता की तो हैदराबादमधील असेल, जिथे विजयचे असंख्य चाहते आहेत. पण विजय देवरकोंडा आता संपूर्ण भारतात सुपरस्टार बनला आहे आणि याचा पुरावा म्हणजे हा त्याचा व्हायरल व्हिडिओ आहे. हा व्हिडीओ हैदराबादचा नसून नवी मुंबईतील एका कार्यक्रमाचा आहे. लायगर या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विजय आणि अनन्या हे नवी मुंबईतील एका मॉलमध्ये पोहोचले होते.

मॉलमध्ये चित्रपटाचं प्रमोशन

रविवारी अनन्या आणि विजयसह संपूर्ण लायगरची टीम प्रमोशनसाठी नवी मुंबईतील एका मोठ्या मॉलमध्ये पोहोचली होती. यावेळी आपल्या आवडत्या कलाकाराची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. या जमावाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये लायगरची गाणी ऐकू येत आहेत. अनेक पापाराझींनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मॉलमध्ये जमलेल्या गर्दीला विजयलाच शांत होण्याचं आवाहन करावं लागलं.

हे सुद्धा वाचा

व्हिडीओ 1-

चाहत्यांचा अक्षरश: पूर

असं म्हटलं जात आहे की, विजयासाठी मुंबईत आलेली ही रेकॉर्डब्रेक गर्दी होती. याआधी अशी गर्दी फक्त बिग बॉसमधील हिना खान आणि शिल्पा शिंदेच्या मॉल टास्कमध्ये दिसली होती. पण तो मॉल मुंबईतील एका अशा जागी होता, जिथे लोक सहज जाऊ शकत होते. पण पहिल्यांदाच मुंबईपासून थोडं दूर नवी मुंबईत कार्यक्रम असूनही विजय आणि अनन्याला पाहण्यासाठी चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्हिडीओ 2-

विजय देवरकोंडाचं बॉलिवूड पदार्पण

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार विजय देवरकोंडा लायगर या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच त्याची बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये चर्चा होत आहे. कॉफी विथ करण एपिसोडमध्ये जान्हवी कपूरने सांगितलं होतं की, तिला विजय देवराकोंडासोबत चित्रपट करायचा आहे. लायगर या चित्रपटात बॉक्सिंग चॅम्पियन माइक टायसनदेखील झळकणार आहे. हा चित्रपट 25 ऑगस्टला प्रदर्शित होत आहे.

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.