Farah Khan : कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेऊनही फराह खानला कोरोनाची लागण, सोशल मीडियावरुन दिली माहिती
बॉलिवूडची प्रसिद्ध चित्रपट निर्माती आणि सेलिब्रिटी डान्स कोरिओग्राफर फराह खानला कोरोनाची लागण झाली आहे. (Farah Khan tested positive of corona virus, information provided on social media)
मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध चित्रपट निर्माती आणि सेलिब्रिटी डान्स कोरिओग्राफर फराह खानला (Farah Khan) कोरोनाची लागण झाली आहे. नुकतंच तिची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह (Corona Positive) असल्याचं आढळून आलं आहे. फराह खाननं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे चाहत्यांना ही माहिती दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे फराह खाननं कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, असं असूनही तिला कोरोनाची लागण झाली आहे.
कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले
फराह लवकरच बरी होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. मात्र डान्स कोरिओग्राफर फराहनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिलं, ‘मला आश्चर्य वाटतं की माझ्यासोबत असं घडलं आहे कारण मी लसीचे दोन्ही डोस घेतले आणि आणि जवळजवळ सर्व लसीकरण पूर्ण केलेल्या लोकांबरोबर काम करूनही असं कसं घडू शकतं!.
…तरीही माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह
फराह खाननं लिहिलं, ‘… तरीही माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी माझ्या संपर्कात असलेल्या सर्व लोकांना आधीच सूचित केलं आहे आणि त्यांना कोरोना टेस्ट करण्यास सांगितलं आहे. वाढत्या वयामुळे आणि स्मरणशक्ती कमी झाल्यामुळे, जर मी कोणाला सांगायला विसरली असेल, तर तुम्हीही तुमची टेस्ट करुन घ्यावी. मला आशा आहे की मी लवकर बरी होईल.
इन्स्टाग्राम स्टोरी
नुकतंच झळकली शाहरुख खानसोबत
नुकतंच फराह खान अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रासोबत रिअॅलिटी टीव्ही शो ‘सुपर डान्सर’ मध्ये दिसली होती. दोघांनीही एकत्र मंचावर डान्स सादर केला. याशिवाय, फराह खाननं अलीकडेच सुपरस्टार शाहरुख खानसोबतचा स्वतःचा एक व्हिडीओ शेअर केला जो प्रेक्षकांना चांगलाच आवडला. या व्हिडीओमध्ये फराहनं शाहरुखच्या गालावर किस केलं.
आता कोरिओग्राफर फराह खान ‘शो पिंचचा सीझन 2’च्या आगामी भागांमध्ये दिसणार आहे. या शोमध्ये फराह खाननं नेपोटिझमवर वादविवाद करणाऱ्यांनाही चांगलंच फटकारलं आहे. प्रोमोमध्ये फराह खाननं कबूल केलं की तिला तिस मार खानसाठी तिच्या ट्रोल केलं आहे, “भाई आता 10 वर्षे झाली आहेत, आता तुम्ही पुढे आहात.” फराहनं तिचा राग ट्रोलर्सच्या विरोधात काढला आहे, “ज्याच्याकडे फोन आहे, तो टीकाकार आहे आणि आम्हाला चित्रपटांबद्दल सर्व काही माहित आहे.” असंही ती म्हणाली आहे.
ट्रोलर्सना सुनावले खडे बोल
फराह खानने असंही सांगितलं की, जरी तिने ट्विटरवर ‘हॅलो’ लिहिलं तरी ट्रोलर्स तिच्यावर “नमस्ते नहीं बोल करती, सलाम नहीं बोल ना.” अशा कमेंट्स करत असतात. जेव्हा एका वापरकर्त्यानं त्यांच्या मुलांची स्लिम असल्याची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा फराह खान म्हणाली, ‘तुम्ही तुमच्या मुलांची काळजी घ्या, मी माझ्या मुलांची काळजी घेईन.
संबंधित बातम्या
Bigg Boss Ott: ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात ‘निया दौर’, हटके एन्ट्री करत निया शर्मा बनली लेडी बॉस
Shruti Marathe : श्रुती मराठेचा हटके ‘बॉर्बी डॉल’ लूक पाहिला का?; फोटो पाहून फॅन्स म्हणाले…